पुरुषांनी उभ्याने लघवी करावी की बसून, पहा ‘या’ पद्घतीने लघवी केल्यास होतात ‘हे’ फायदे…..

आपण आजवर साधारणत: पुरुष मंडळींना कार्यालयात किंवा इतरत्र लघवी करताना पाहिले असेल. कार्यालयात बहुतांश पुरुष हे उभ्याने लघवी करतात. मात्र, कार्या ल यात एखादी व्यक्ती बसुन लघवी करत असेल तर त्याच्यावर सर्वजण हसल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, बसून लघवी करण्याची काही शास्त्रीय व वैद्यकीय कारणे आहेत. तसेच यामागे काही आजार देखील असू शकतात.
त्यामुळे लघवी बसून करावी की उभ्याने यावर अनेक मतमतांतरे आहेत. आपण एखाद्या गावाला जात असू त्यावेळी रस्त्यातच आपल्याला लघवी आली तर आपण गाडी बाजूला घेऊन उभ्याने तसेच बसून लघवी करू शकतो. जुनी मंडळी ही बहुतांश बसूनच लघवी करायची, या मागची कारणे वेगवेगळी आहेत.
मात्र, आता शहरी भागात बसून लघवी करण्याची प्रथा मोडीत मिळाल्याचे जमा आहे. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये दोन्ही कारणे विशद करणार आहोत. काही दिवसांपूर्वीच याबाबतचा एक अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये बरीचशी कारणे स्पष्ट झाली आहेत. ज्या पुरुषांच्या प्रोस्टेटची समस्या अधिक प्रमाणात असतील, अशा पुरुषांनी बसून लघवी करणे कधीही चांगले असते.
कारण त्यांना सूज आलेली असते, त्यामुळे उभ्याने लघवी केल्यास त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या तुलनेत बसून लघवी केली तर त्यांना सहज सुकर होते. काही दिवसापूर्वी घेण्यात आलेल्या अभ्यासात सुदृढ आणि लो यूरिन ट्रॅक्ट सिस्टीमच्या पुरुषांची तुलना करण्यात आली. त्यामध्ये हे तथ्य समोर आले. सुदृढ पुरुषांना उभ्याने लघवी केल्यास काही अडचण येत नाही.
मात्र, ज्यांची प्रोटेस्ट वाढलेली आहे, त्यांना उभ्याने लघवी करताना त्रास जाणवतो. त्यामुळेच पुरुषांनी आपापल्यापरीने लघवी करावी. यातच त्यांच्या आरोग्याला फायदा असतो. जुन्या काळचे लोक बसून लघवी करायची. त्याचे कारण हेच होते की कुठल्याही आजारांना निमंत्रण नको, म्हणून ते बसूनच लघवी करायचे.