पायांच्या भेगांवर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय..होतील कायमस्वरूपी मऊ

पायांच्या भेगांवर करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय..होतील कायमस्वरूपी मऊ

पायाला भेगा पडणे सामान्य गोष्ट आहे. मात्र यामुळे पायांना त्रास होतो. हिवाळा असो की उन्हाळा पायाला भेगा पडतच असतात. त्यामुळे पायाची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचेचा मुलायमपणा कमी होऊन रुक्ष होते. थंडीत पाण्यात खूपवेळ राहिल्य़ानं किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. टाचांमधून रक्त येतं किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो.

त्यासाठी बऱ्याचवेळा आपण क्रीमचा वापर करत असतो. काहीवेळा क्रीमने तेव्हड्यापुरतं बरं होतं. मात्र हा त्रास तात्पुरता बरा होतो. काहींना क्रीमची अॅलर्जी असते अशावेळी थोडी आपली आपण काळजी घेतली आणि घरगुती उपाय केले तर थंडीतही तुमच्या टाचा मुलायम राहातील.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठेही बाहेरून जाऊन आल्यावर पाय स्वच्छ धुवा. आपल्य़ा पायाला माती राहणार नाही याची काळजी घ्यावी. मातीमुळे पायात जंतू राहतात आणि पायाची त्वचा कोरडी पडते.

हील बामचा वापर करा : टाचांना पडलेला भेगांपासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही हील बामचा वापर करू शकता. हा बाम लावल्यानंतर तुमच्या टाचांवरील मृत त्वचा निघून जाते आणि टाचा मुलायम करण्यास मदत करतो. हील बाममध्ये यूरिया, साइलिसियल अॅसिड असणं आवश्यक आहे. ही क्रीम लावल्यानंतर पायात मोजे घालावेत.दिवसातून दोन ते तीन वेळा या क्रीमचा वापर केल्याच परिणाम लवकर दिसून येतात.

मृत त्वचा काढून टाका : टाचांवर मृत त्वचा राहिल्यामुळे चालताना ही त्वचा अधिक त्रास देऊ शकते. तसंच टाचांना असलेल्या भेगा अधिक तीव्र होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी कोमट पाण्यात पाय ठेवून ही मृत त्वचा काढून टाकावी. त्यानंतरच क्रीम किंवा पेट्रोलियम जेलचा वापर करावा.

नारळाचं तेल, तूप, कोरफडीचा करा उपयोग: रुक्ष झालेली त्वचा मुलायम करण्यासाठी नारळाचं तेल हा उत्तम पर्याय आहे. नारळाचं तेल अंघोळीच्या पाण्यातही वापरलं तरी हरकत नसते. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलानं टाचांना हलक्या हाताने मालिश करावी.तुमच्या टाचांमधून रक्त येत असेल किंवा टाचांना सूज येत असेल तर खोबरेल तेल सूज कमी करण्यासाठी गुणकारी औषध समजलं जातं.

खोबरेल तेलामध्ये अँटीमिक्रोबियल गुण असतो. त्यामुळे दोन वेळा तुम्ही हलक्या हातांनी पायांवर मालिश केल्याचा त्याचा फरक पडतो. अशाच पद्धतीनं तूप आणि कोरफडही तुम्ही पायांना लावू शकता. कोरफड आणि तुपामुळेही त्वचेतील सुक्षपणा, खरखरीतपणा कमी होण्यास मदत होते.

झोपताना पाय स्वच्छ धुवून हर्बल डेव्हलपर क्रीम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो > कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात. >लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.>बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.>चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.

हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.>भेगा पडू नयेत, यासाठी अंघोळ करताना रोज पायांचे तळवे प्युमिक स्टोनने घासावेत. >आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश करावे. >घरातही चप्पल वापरावी. बाहेर पडताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सर्व उपायांनी पायांचे सौंदर्य जपणे सहज शक्य आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *