पत्नी पतीसोबत नेहमी दु:खी अन् थ’कलेली असायची; पतीला सं’शय आला म्हणून बे’डरू’ममध्ये कॅमेरा लावला अन्…

पती-पत्नीचे नाते हे काही वर्षांचे नाही तर आयुष्यभराची साथ असते. ह्या नात्यामध्ये पती आणि पत्नी दोघांनी एकेमकांना समजून घेऊन, विश्वास देऊन प्रेम आणि आपुलकी ने जपले तर हे नाते तुम्हाला आयुष्यभर आनंद आणि सुख देते. पती आणि पत्नी ह्या दोघांनी एकमेकांना वेळ देणे साहजिकच खूप महत्वाचे असते.
जितका जास्त वेळ हे दोघे एक सोबत घालवतात तेवढे जास्त ह्या दोघांचे नाते मजबूत आणि सुंदर बनते. त्या दोघांमध्ये कधीही कोणताही वा’द निर्माण होत नाही आणि हे नाते सगळ्यात घट्ट आणि विश्वासाचे असे नाते बनते. पती-पत्नी एकमेकांना जितका जास्त वेळ देतील, तेवढे त्यांच्यामधील सर्व गै’रसमज दूर होतील आणि त्यांच्या दोघात विश्वास निर्मण होतो.
मात्र आपला पती असेल किंवा पत्नी, नेहमीप्रमाणे वागत नसेल किंवा थोडा जरी वागण्यात बदल झाला तर, तो त्यांचा त्वरित लक्षात येतोच. त्यालाच तर खरे आणि घट्ट असे नाते आपण म्हणतो ना.. मात्र. जे एकाने ह्या नात्यामध्ये आपले सर्वस्व झोकून दिले आणि दुसऱ्याने त्याची कदर नाही ठेवली तर हेच नाते अतिभ’यंकर असे रूप देखील घेऊ शकते असे आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे.
असेच काही झाले अमेरिकेतील लॉस अँजेलिस ह्या शहरामध्ये.. एक जोडपे ह्या शहरामध्ये खूप प्रेमाने आणि आनंदाने राहत होते. मेलनियाकडे सगळं काही होत. तिच आपलं विश्व.. प्रेम करणारा पती, उत्तम जॉब आणि तीन गोंडस मुलं… ती आपले आयुष्य नादात आणि सुखात जगत होती.
सुरुवातीच्या वर्षात ती आपल्या पतीसोबत खूप वेळ घालवायची आणि दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी होते. मात्र, दिवस बदलले आणि तिच्या वागण्यात चांगलाच फरक पडू लागला..तिची चि’डचि’ड वाढली, तिने आपल्या पतीला वेळ देण्याचे बंद केले. त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर हास्य कुठे तरी पळून गेले होते आणि ती सतत दुःखी दिसू लागली…
तिच्या पतीने काही वेळ जाऊ दिला, मात्र तिच्या वागण्यात काहीच बदल नाही झाला. तिच्या पतीला शं’का येऊ लागली की, ती त्याला धो’का देत असावी आणि त्याच्याव्यतिरिक्त तिचे इतर कोणाशी संबं’ध असावे. ह्याच सं’श’यातून, त्याने कोणालाही पत्ता न लागू देता घरातच कॅमेरा लावला.
तिचा पती ट्रॅव्हलिंग जॉब करत आहे, म्हणून त्याने हि शक्कल लढवली आणि त्याच्यासमोर जो प्रकार आला त्याने त्याला निशब्द केलं.. तीन मुलं आणि जॉब, ह्यामध्ये मेलनियाने पूर्णपणे स्वतःला झोकून दिले होते. आपल्या मुलांना उठायच्या आधी ती उठत असे, त्यानंतर सर्वांसाठी जेवण बनवत असे आणि मग स्वतः तैयार होऊन ऑफिसात धाव घेते.
रात्री पण तिन्ही मुलं झोपल्यावरचं ती झोपते. त्यामुळे तिची झोप पूर्ण होत नाही, स्वतःसाठी तिला वेळ मिळत नाही, मात्र त्यामुळे आपल्या तिन्ही लेकरांना सांभाळण्यात ती कसलीच कमी ठेवत नाही हे बघून तिचा नवरा खूपच भावुक झाला. त्याने सुपरमॉम म्हणत तिचा एक व्हिडीयो देखील शेअर केला आणि तिची काम वाटून न घेऊ शकत असल्यामुळं तिची मा’फी देखील माघितली…