पत्नीची राहत्या घरी आत्महत्या, जवानाला कळताच ऑन ड्युटी उचलले असे धक्कादायक पाऊल की वाचून अंगावर येईल काटा…

पत्नीची राहत्या घरी आत्महत्या, जवानाला कळताच ऑन ड्युटी उचलले असे धक्कादायक पाऊल की वाचून अंगावर येईल काटा…

सत्यवान सावित्रीची कथा तर तुम्ही ऐकलीच असेल. त्यांचे प्रेम, त्याग आणि बलिदानाची कथा ऐकून पती पत्नीचे नाते कसं असावं याच उदाहरण समोर येते. मात्र आजच्या व्यवहारिक जगात असं प्रेम बघायला मिळणं दुर्मिळच. आपल्या जोडीदारावर प्रेम करण्याचे दावे तर सगळेच करतात, मात्र जेव्हा खरोखर साथ देण्याची वेळ येते तेव्हा कितीजण साथ देतात?

पण आजच्या व्यवहारिक आणि कृत्रिम जगात देखील आपल्या जोडीदारासाठी, प्रेम सिद्ध करणारी एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीने देखील आपले आयुष्य संपवल्याची मनाला चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे.

विशेष म्हणजे पती सीआरपीएफ जवान होता आणि त्यावेळी ड्युटीवर होता, म्हणून या बातमीने सगळीकडेच खळबळ उडवली आहे. गडचिरोलीमधून सदर धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे.

या जवानांचे कुटुंबिय शक्यतो बाहेर गावीच वास्तव्यास असतात. याच कॅम्पमध्ये, छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी चांद्रभूषण जगत कार्यरत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी, चांद्रभूषण यांना त्याच्या पत्नीने आ’त्मह’ त्या केल्याचे समजले.

ही बातमी समजताच चांद्रभूषण यांनी देखील त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीचा वापर करत स्वतःवर गोळी झाडली. गोळीचा आवाज येताच, सदर कॅम्पमधील इतर जवानांनी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णलयात पोहोचल्यानंतर येथे येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

‘पत्नीच्या आ’त्म’ह’ त्येची बातमी ऐकल्या नंतर चांद्रभूषण यांना मोठा धक्का बसला होता. यामुळे ते सुन्न झाले होते. त्यांना सावरायला थोडा वेळ मिळावा म्हणून आम्ही त्यांना एकांत दिला. मात्र तो असं काही करेल याचा आम्ही विचार देखील केला नव्हता. त्याच्या बायकोवर त्याचं खूप प्रेम होत.

चांद्रभूषण नेहमीच आपल्या बायकोबद्दल आम्हाला सांगत होता. त्याच्या बायकोने हे पाऊल का उचलले आणि त्यानंतर त्याने देखील असं पाऊल उचलणे सगळंच खूप धक्कादायक आहे, ‘ असं चांद्रभूषण यांचे साथीदार यादव यांनी सांगितले. काहीच महिन्यांपूर्वी चांद्रभूषणचे लग्न झाले होते.

आपल्या पत्नीसोबत काही वाद आहेत, असं त्याच्या बोलण्यातून कधीच समोर आले नाही. संसार अगदी व्यवस्थित आणि सुखाचा आहे असच तो बोलत होता. सगळं काही व्यवस्थित असताना, त्याच्या पत्नीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. धानोरा पोलीस पुढील तपास करत आहेत. लवकरात लवकर सत्य समोर घेऊन येणाचा प्रयत्न करू, असं तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.