नियमित ताक पिल्याने होतात ‘हे’ चमत्कारिक आरोग्यवर्धक फायदे!

नियमित ताक पिल्याने होतात ‘हे’ चमत्कारिक आरोग्यवर्धक फायदे!

ताक म्हटल गोड, आंबट अशी चव लगेच जीभेवर येते. ताक कुणाला आवडते तर कोण ताक म्हटल की नाकमुरडत असतात. पण ताक हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताकात विटामिन ” B 12 ”, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फायद्याचे असतात.

ज्यांचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांना ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

ताक पिण्याचे हे आहेत फायदे

ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे.त्रास कमी होतो.

महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते.दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.

चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.

रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NEWS UPDATE याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.