ना किसिंग सीन, ना बोल्ड सिन ,ना शॉर्ट ड्रेस, तरीही ही अभिनेत्री प्रत्येकाची पसंतीची आहे….

आजकाल चित्रपटसृष्टीत सगळ्या अभिनेत्री हॉट आणि बोल्ड रूप घेऊनच चित्रपट श्रुष्टीत पदार्पण करतात. त्यांना सुरुवातीला चित्रपटात नको ते सिन द्यावे लागतात मग त्यात किसिंग सिन असेल नाहीतर बिकिनी वरील सिन. किंबहुना त्यांना सुरवातीला तसे करावे लागत असेल नाहीतर स्टारडमसाठी ते तसं करत असणार.
पण या सगळ्या गोष्टीला वावगे ठरते ती एक अभिनेत्री, जिने आजवर एकही चित्रपटात किसिंग सिन दिला, बोल्ड सिन दिला म्हणजे बोलायचे झालं तर तिने साधा शॉर्ट ड्रेस देखील एकाही चित्रपटात आजपर्यंत घातलेला नाही. पण तरीही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आणि तिचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्रीबद्दल.
त्या अभिनेत्रीचे नाव ‘कीर्ती सुरेश’ असून ती दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सौम्यतेमुळे आणि निखळ सौन्दर्यामूळे तिला सम्पूर्ण देशांमधील लोक खूप पसंत करत आहेत. कीर्ती तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळेही खूप लोकप्रिय होत आहे. तिची राहण्याची शैली लोकांना खूप आवडतं आहे.
कीर्ती ही अशी अभिनेत्री आहे जिने कधीही चित्रपटात किंवा तिच्या वास्तविक जीवनात शॉर्ट कपडे घातलेले नाही. ती नेहमी साडी आणि सलवार सूटमध्येच दिसते. कोणताही चित्रपट साइन करण्यापूर्वी ती लिहिते की तिला चित्रपटात किस करण्यासाठी विचारले जाणार नाही. किंवा बोल्ड सिनसाठी विचारले जाणार नाही.
कीर्ती तिच्या साधेपणामुळे आणि चांगुलपणामुळे सर्वांना आवडत आहे. कीर्तीने तिच्या कारकीर्दीत तमिळ, तेलगू आणि मल्याळम सारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. कीर्तीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या आगामी चित्रपटाचे नाव मराकर: अरबीकादालिंते सिंघम आहे जो 26 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होईल.