धक्कादा’यक ! ग’र्भव’ती पत्नीशी सं’बं’ध ठेवता येत नसल्यानं रा’क्षस बनला पती, केलं एवढं भ’यान’क कृ’त्य की पो’लिस’ही हा’दरले..!

बालकलाकार, जेव्हा कोणत्याही सिनेमा मध्ये किंवा मालिके मध्ये किंवा एखाद्या जाहिरातीमधून आपली ओळख निर्माण करतात, तेव्हा ते मोठे झाल्यावर नक्की कसे दिसतात हे बघायनासाठी सर्वच अगदी अधीर असतात. तारे जमीन पर मधला दर्शील सफारी असेल, टाईमपास मधली केतकी असेल, शाळा मधला अंशुमन असेल अश्या काही बालकलाकारांनी आपल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार अश्या अभिनयाने आपली वेगळी छाप सोडली. बॉलीवूड मधील तारे जमीन पर, चिल्लर पार्टी सारखे सिनेमा असतील किंवा मराठी मधील शाळा, दहावी फ, एलिझाबेथ एकादशी, किल्ला, बालक पालक असे सिनेमा असतील, या बालकलाकारांनी आपल्या चिमुकल्या खांद्यावर पूर्ण सिनेमाचा भार उचलला. आणि अपेक्षापेक्षा भरगोस यश या सिनेमांना मिळवून देत आपली नवीन ओळख बनवली. अश्याच सिनेमांमध्ये एका नाव आहे एलिझाबेथ एकादशी या सिनेमाचं. हलका फुलका पण तरीही सत्य परिस्थितीची झळ बसवणारा अश्या या सिनेमाने भरगोस कौतूक आणि यश कमवले. यामधील बालकलाकार म्हणजेच नंदिता धुरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हेच या सिनेमामधील प्रमुख पात्र होते. या सर्वानी, या सिनेमामध्ये इतका उत्तम आणि दर्जेदार अभिनय केला होता कि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार पटकावून दिला होता. तसे तर या चित्रपटामधील सर्वच पात्र, आणि सर्वच किस्से कायम सर्वांच्या लक्षात राहतील असेच होते. मात्र,गरमा-गरम बांगड्या विकणाऱ्या झेंडूने सर्वांचे मन मोहून घेतले होते. गरम-गरम चहा तर खूप वेळा ऐकलं होत पण, ‘ए गरम बांगड्या, गरम बांगडया’ म्हणत झेंडूने बांगड्या विकून एक नवीन विक्रमच केला होता! या चिमुकल्या झेंडूची भूमिका, सायली भंडारकवठेकर हिने साकारली होती.परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी या चित्रपटामधून झेंडू म्हणजेच सायली घराघरात पोहोचली. सायलीने मुक्ता अर्थात झेंडूची तर तिच्या मोठ्या भावाची म्हणजेच ज्ञानेश ची भूमिका श्रीरंग महाजनने साकारली होती. आपल्या वडिलांची अखेरची निशाणी म्हणून आपली, सायकल वाचवण्यासाठी या बालकलाकारांनी काय काय आटापिटा केला आणि त्यातून घडलेल्या घडामोडीचे दर्शन दिग्दर्शकाने अतिशय उत्तमपणे रेखाटले आहे.यात सर्वात हटके आणि खास असा डायलॉग, म्हणजेच “ए गरम बांगड्या, गरम बांगडया.” झेंडूच्या तोंडी असलेला हा संवाद प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहतो. अभिनयापेक्षा नृत्याची जास्त आवड,झेंडूची भूमिका साकारणारी सायली भंडारकवठेकर हिला आहे.तिने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास, अगदी लहान असल्यापासूनच सुरुवात केली होती. याच क्षेत्रामध्ये सायलीला करिअर करायचे आहे असे ती सांगते. सिनेमामध्ये छोटीशी असणारी झेंडू आता मोठी झाली आहे. आजच्या डिजिटल युगात सायली मात्र आपल्या सोशल मीडियावर कमीच बघायला मिळते. मात्र, ती कमालीची ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. सुंदरसा मेकअप आणि हटके अंदाज यामुळे ती खूपच स्टायलिश दिसते. तूर्तास तरी आपल्या नृत्य कलेवर च जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार असून, लगेच अजून काही सिनेमा किंवा मालिकांमध्ये काम करण्याचा आपला विचार नाहीये असे ती सांगते. मात्र भारतीय क्लासिकल नृत्यामध्ये ती चांगलीच पारंगत झाली असून त्यातच पुढे मोठं व्हायचं आहे असेही सायली सांगते. पंढरपूर मधल्याच, कवठेकर प्रशालेत शिकत असणारे, सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये निवडण्यात आले होते. ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजनने याआधी चिंटू २ चित्रपटात काम केले होते. श्रीरंग महाजन हा मूळचा पुण्याचा येथूनच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर पुष्कर लोणारकर या सिनेमा व्यतिरिक्त टीटीएमएम (तुझं तू माझं मी), रांजण, बाजी, चि व चि सौ का चित्रपटात पहायला मिळाला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *