देवापाशी भीमसेनी कापूर जाळल्याने हे दोष होतात दूर.. जाणून घ्या फायदे..

गेल्या काही वर्षांपासून भारतामधील लोक हे अधिक प्रमाणात धार्मिक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे अशा चर्चा रंगत आहेत की, लोक देवाला मानत नाही तर दुसरीकडे लोक मोठ्या प्रमाणात धार्मिक होऊन देवाची पूजा करताना आढळतात. देवाची पूजा करण्यासाठी आपल्याला विविध साहित्य लागत असते.
यामध्ये हार-फुले अगरबत्ती अष्टगंध, गुलाल, दुर्वा आणि इतर साहित्य यांचा समावेश असतो. तसेच आपण देवाची आरती करतो. त्यानंतर आरती झाल्यावर कापूर आरती देखील असते. कापूर आरतीसाठी कापूर आवश्य लागतो. आज-काल बाजारामध्ये कापूर हा भेटतो. मात्र, दर्जेदार असतोच की नाही याबाबत शंका उपस्थित होते.
या तुलनेत भीमसेनी कापूर हा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असतो. याचे वैज्ञानिक फायदे देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत. कापूर जाळल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळते. तसेच आपल्याला धार्मिक समाधानही मिळते या कापराचे फायदे फार मोठे आहेत. भिमसेनी कापूर हा झाडांपासुन मिळवला जातो.
हा कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येत असतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसल्याचे सांगण्यात येते. रासायनीक कापुर पाण्यावर तरंगतो.भिमसेनी कापुर तरंगत नाही.
कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे. दक्षिण भारतात तीर्थांत विलायची आणि भीमसेन कापूर वापरतात.
बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही याचा उपयोग केला जातो. खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी याच कापराचा उपयोग करतात. घरात कापूर रोज लावल्यावे अॉक्सिजन ९ -११ टक्के एवढा वाढतो. शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.