दिवाळीच्या अगोदर घरातून काढून टाका ‘या’ 10 वस्तू, अन्यथा होईल लक्ष्मी मातेचा कोप..

हिंदू धर्मात दिवाळी हा एक मोठा सण म्हणून साजरा केला जाते. यावेळी दिवाळी शनिवार, 14 नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाईल. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.या दिवशी देवी श्रीमहलक्ष्मी, श्रीमहाकली, भगवान गणेश, श्रीकुबेर, कुलदेवता आणि इत्यादी देवतांची पूजा करून वर्षभर सुखी आयुष्य जगण्यासाठी लोक प्रार्थना करतात.
पौराणिक कथांनुसार, देवी श्रीमहलक्ष्मी कार्तिक अमावस्येच्या मध्यरात्री आपल्या भक्तांच्या घरी जातात आणि त्यांना संपत्तीचा आशीर्वाद देवून भक्तांना आनंदी करतात.
पूजेचा सर्वोत्तम वेळ कधी आहे:- 14 नोव्हेंबर हा उत्तम मुहूर्ता प्रदोष काल आणि महानिष्ठा काल म्हणून गणला गेला आहे, परंतु अमावस्याच्या सुरूवातीच्या आधी, मध्यभागी नक्षत्र संयुक्त, लग्न काल आणि चौघडिया असे बरेच मुहूर्त आहेत ज्यामध्ये लोक मोठे काम करण्यास सुरवात करू शकतात.
जेथे लक्ष्मीचा निवास आहे तेथे:- असे मानले जाते की ज्या घरात घाण व इतर अशुभ गोष्टी घडतात त्या घरात देवी लक्ष्मी जात नाही. देवी लक्ष्मीला स्वच्छता फार आवडते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवशी घरात कोणत्याही तुटलेल्या वस्तू असू नयेत.
तर आपण आज जाणून घेणार आहोत अशा 10 गोष्टीबद्दल ज्या लक्ष्मी देवीला आवडत नसतात, या गोष्टी आपण त्वरित घरातून हटवा नाहीतर आपणास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते
.
१. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातून टाकीतून किंवा नळातून जर पाणी गळत असेल तर यामुळे आर्थिक नुकसान होते, यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होवू शकतो.
2. घरात असलेला तुटलेला आरसा हा देखील घरात नकारात्मक प्रभाव टाकतो. घरामध्ये यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. म्हणून दिवाळी आधी असे तुटलेले आरसे घरातून काढून टाका.
3. जर तुमच्या घराच्या भींतीवर डाग पडले असतील, भीती खराब झाल्या असतील तर त्याला लवकरात लवकर ठिक करा. हे दुर्भाग्य आणि गरिबीला आकर्षित करते.
4. जर घरात वीजेवरची कोणतीही वस्तू बंद पडली असेल तर त्याला लवकरात लवकर दुरुस्त करा किंवा मग घरातून काढून टाका.
5. घराचं छप्पर हे नेहमी साफ असावं. छप्पर स्वच्छ नसल्यास ते घरात धन येण्यास प्रतिबंध करते.
6. घराच्या सजावटीसाठी सुखलेल्या फुलांचा वापर नाही केला पाहिजे. नेहमी ताजे आणि सुंगधीत फुलांचा वापर करा.
7. तुमच्या घरात असलेल्या झाडावर जर वाळलेली पाने दिसत असतील तर ती तोडून टाका.
8. घरात कबूतरचा घरटे अस्थिरता आणत असते. घरावर जर असं घरटं असल्यास ते काढून टाका.
9. घराजवळ असलेला मधमाशांचा पोळा हा देखील अशूभ मानला जातो. त्यामुळे तो ही घराजवळ असू नये.
10. वटवागुळ दिसणे हे तसे अशूभ मानलं जाते. पण घरात त्याचा प्रवेश होणे हे देखील अशुभ आहे. या आहेत आपल्या घरातील अशुभ 10 गोष्टी या गोष्टी दिवाळी याच्या आधीच घरातून काढून टाका. तसेच वास्तूशास्त्राबद्दल आणखी उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या पेज ला नक्की फॉलो करा.