दिवाळीची साफ-सफाई करताना ‘या’ पाच गोष्टी सापडल्या तर आहेत शुभ संकेत, लाभणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद, होईल पैशाची भरभराट..

दिवाळीची साफ-सफाई करताना ‘या’ पाच गोष्टी सापडल्या तर आहेत शुभ संकेत, लाभणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद, होईल पैशाची भरभराट..

नवरात्र आणि दसरा संपून आता सगळीकडे दिवाळी सणाची तयारी सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. दुकानांमध्ये दिवाळी बंपर सेल लागला आहे. सोबतच सुके मेवे अर्थात ड्रायफ्रुट्स, मिठाईचे दुकाने इथेदेखील वेगवेगळ्या सवलती सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. बाजारपेठा रंगबिरंगी कंदीलने भरून गेले आहेत. त्याचबरोबर, सजावटीचे इतर सामान देखील बाजारपेठांची शोभा वाढवत आहेत.

सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. कपड्याच्या, इलेक्ट्रॉनिक्स आणि किराणा दुकानांमध्ये देखील चांगलीच गर्दी बघायला मिळत आहे. यासर्वांसोबतच आपल्या सर्वांच्याच घरांमध्ये देखील दिवाळीची तयारी सुरू झाली असेल. फराळाला कोणते पदार्थ करायचे किंवा यंदाच्या वर्षी कोणते वगळायचे, इथपासून ते कोणत्या दुकानातून नवीन कपडे घ्यायचे आणि कोणती इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी करायचे, याची चांगलीच तैयारी जवळपास प्रत्येकाच्याच घरात बघायला मिळते.

मुलांना देखील ऑनलाइन क्लास अर्थात शाळेच्या सुट्ट्या लवकरच सुरू होतील. त्यामुळे छोट्या मुलांची आपली स्वतःची फटाक्यांची यादी देखील तयार नक्कीच असते. आपल्या सर्वांच्याच घरी दिवाळी सण म्हटलं की, घराची साफसफाई आलीच. आपल्या हिंदू धर्मामध्ये देखील, विधान आहे जिथे स्वच्छता नसते तेथे लक्ष्मी वास करत नाही.

त्यामुळे सुरुवातीपासूनच कोणत्याही सणाला संपूर्ण घराची स्वच्छता करण्याचे विधान आहे, खासकरून दिवाळीला. दिवाळीच्या वेळी, घरातील कानाकोपरा सर्वजण स्वच्छ करतात. दिवाळी सण केवळ हिंदु धर्मातच नाही तर, इतर धर्मात देखील चांगल्याच उत्साहाने साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी दिवाळी ४ नोव्हेंबरला अर्थात गुरुवारी साजरी केली जाणार आहे.

गुरुवार तसा लक्ष्मीच वार समजला जातो, म्हणून यंदाचा मुहूर्त अगदी खास असल्याचे बोलले जात आहे. साफ सफाई करताना आपल्याला जुन्या अशा अनेक गोष्टी आढळतात. पण काही गोष्टी आपल्यावर, लक्ष्मी माता कृपा करणार आहे याचे संकेत घेऊन येतात, याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. चला तर जाणून घेऊ या, साफसफाईच्या दरम्यान जर तुम्हाला या पाच गोष्टी मिळाल्या तर नक्कीच यंदाच्या दिवाळीला लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल.

१.जुनी पिशवी पर्स किंवा बॅग:- जुनी पिशवी पर्स किंवा बॅग यामध्ये, जर तुम्हाला पैसे आढळले तर ते खुप शुभ समजले जाते.

२.बासुरी किंवा मोरपंख :- घर किंवा पूजा स्थळाच्या साफसफाईच्या वेळी, बासुरी अथवा मोरपंख मिळणे देखील खूपच शुभ समजले जाते. भगवान विष्णूचा मानव-अवतार अर्थात श्रीकृष्णश संबंधित या वस्तू असल्यामुळे त्या गोष्टी सापडल्यास त्या घरावर कायम लक्ष्मी मातेची कृपा राहते. केवळ बासुरी किंवा मोरपंखच नाही तर, श्रीकृष्ण सोबत निगडीत इतर काही गोष्टी सापडल्या तरीही लक्ष्मीमाता आपली कृपा त्या घरावर नक्की करते.

३. शंख-शिंपले :- घर स्वच्छ करत असताना, शंख किंवा शिंपले सापडले तर ते फेकून न देता गंगेच्या पाण्याने; अथवा स्वच्छ जलाने धूवून आपल्या संपत्तीच्या ठिकाणी अर्थात तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख समृद्धी अखंड नांदते.

४. तांदूळ:- स्वयंपाक घर साफ करत असताना, जर तुम्हाला कोणत्या तरी पिशवीत ठेवलेला तांदूळ सापडला तर ते तुमच्यासाठी अत्यंत उत्तम भाग्याचे संकेत समजले जातात. त्यामुळे अन्नपूर्णेचा वास त्या स्वयंपाक घरात कायम राहतो.

५. लाल कपडा:- साफसफाई करत असताना तुम्हाला कुठेही लाल कपडा दिसला तर, तो नक्कीच जपून ठेवा. हा लाल कपडा तुमचा येणारा दिवस अत्यंत चांगला असल्याचे संकेत तुम्हाला देतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *