दिल दोस्ती दुनियादारीच्या ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीच्या नि’धनाने पुरती खचली अभिनेत्री

दिल दोस्ती दुनियादारीच्या ‘या’ अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीच्या नि’धनाने पुरती खचली अभिनेत्री

सासू-सुनांच भां’डण, कट-कारस्थान, असं सगळं आपल्याला जवळपास प्रत्येक मालिकेत बघायला मिळते. म्हणून युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अगदी हटके आणि त्यांच्या मनातील मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या रूपात झी मराठी घेऊन आली. बघता बघता या मालिकेची लोकप्रियता प्रचंड वाढली.

या मालिकेची लोकप्रियता बघता, मेकर्स मालिकेचा दुसरा सिझन देखील घेऊन आले. या मालिकेसोबतच मालिकेतील कलाकारांना देखील खास ओळख मिळाली. सुजय, आना, कैवल्य, आशुतोष, मीनल, रेश्मा ही नावं घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे अमेय वाघ आणि एखादा कलाकार वगळता सर्वच कलाकार नवखे होते.

या मालिकेतील बऱ्याच कलाकारांनी आपल्या अभिनयाची सुरुवातच या मालिकेमधून केली. या सर्वच नवख्या कलाकारांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. खास करून मनाली म्हणजेच स्वानंदी टिकेकरला प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिले. त्याच कारण देखील तसेच आहे. प्रसिद्ध अभिनेता उदय टिकेकर आणि गायिका आरती टिकेकर यांची मुलगी स्वानंदीला कोणीही खास प्रोजेक्टमध्ये सहजपणे काम दिल असत.

मात्र स्वानंदी आपली वेगळी ओळख निर्माण करायची म्हणून मालिकांमधून काम करायला सुरुवात केली. आज खरोखर स्वानंदीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणून तर इंडियन आयडल सारख्या प्रसिद्ध रियालिटी शोचे होस्टिंग करण्याची जबाबदारी स्वानंदीकडेच देण्यात आली आहे. आपल्या निखळ हास्याने स्वानंदी कोणाचेही मन जिंकून घेते.

एरव्ही सतत हसत खेळत राहणारी स्वानंदी आता मात्र कठीण प्रसंगातून जात आहे. तिच्यावर दुःखाचा डोंगर को’सळला आहे. स्वानंदी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. अनेकवेळा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वानंदी सोशल मीडियाचा आधार घेते. आता देखील आपल्या भावना व्यक्त करत एक अत्यन्त दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

नुकतंच स्वानंदीने आपल्या मामानं गमावलं आहे. त्यामुळे ती खूप जास्त दुखत आहे. सोशल मीडियावर आपल्या मामाच्या आठवणीत स्वानंदीने भली मोठी पोस्ट केली आहे. यामध्ये स्वानंदी म्हणते, ‘मला तुमची किती जास्त आठवण येत आहे हे मी शब्दांत मांडूच शकत नाही. माझ्या जवळचा सगळ्यात दिलखुलास आणि आनंदी व्यक्ती मी गमावला आहे.

मला खूप जास्त दुःख होत आहे. तुमच्या जाण्यामुळे मला खूप रिकामं वाटत आहे. तुमच्यासारखाच प्रत्येकाला प्रेम आणि सतत हसत ठेवण्याचा प्रयत्न मी करेल. आपल्या कुटुंबाचा तूच ‘स्टार’ होतास आणि कायम राहणार.’ यासोबतच स्वानंदिने एक छोटासा संवाद देखील शेअर केला आहे.

तिची ही पोस्ट सोशल मीडियावर सगळीकडेच पसरत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकार देखील तिचं सांत्वन करत आहेत. स्वानंदी आपल्या मामाच्या खूप जवळ होती. त्या दोघांमध्ये मैत्रीचे खास नातं होत, त्यामुळेच आपल्या मामाच्या रूपाने तिने तिचा सगळ्यात खास मित्र गमावला असलायचं स्वानंदी म्हणते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.