तुमचा विश्वास बसणार नाही पण उंदरमुळे वाचला घरातील 5 माणसांचा जीव, वाचून आश्चर्यचकित व्हाल..

तुमचा विश्वास बसणार नाही पण उंदरमुळे वाचला घरातील 5 माणसांचा जीव, वाचून आश्चर्यचकित व्हाल..

आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वच प्राण्यांना एक खास महत्व आहे. प्रत्येक प्राणी हे जग व्यवस्थित चालावे यासाठी काही तरी योगदान देत असतो. काही प्राणी आपल्या देवदेवतांचे वाहन म्हणून महत्वाचे आहेत. तर काही प्राणी त्यांच्या खास सवयीमुळे महत्वाचे ठरतात.

यामध्ये सर्वच लहान मुलांना गणपती बाप्पाच्या वाहनाकडे अर्थात उंदराकडे खास आकर्षण असल्याचे आपण पहिले आहे. उंदीर मामा म्हणून त्यांना धार्मिक महत्व आहे. मात्र, आपल्या घरात जेव्हा उंदीर येतात तेव्हा सहाजिकच त्यांच्या गुणधर्मामुळे ते कोणालाच नकोसे असतात. अनेकवेळा त्या उंदरांना पळवून लावण्यासाठी वेगवेगळे हतखण्डे आजमावले जातात.

मात्र, काही केल्या हे उंदीर जात नाहीत म्हणून अक्षरशः वैताग येतो. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर्वाना वैताग देणाऱ्या याच उंदरांनी कुटुंबातील पाच व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. एका उंदरामुळे अख्खं कुटुंब वाचलं आहे. उंदरासारखा प्राणी माणसांसाठी देवदूत ठरल्याचं राजस्थानमधील हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

जाळ्यात अडकलेल्या एका सिंहाला सोडवून उंदराने त्याचा जीव वाचवल्याची गोष्ट आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु असं काही प्रत्यक्षात घडेल असा विचार आपण कधी केलाच नसेल. मात्र नुकतंच राजस्थान येथील धौलपूर जिल्ह्यातील सिकरौदा गावात ही आश्चर्याची घटना घडली आहे. सिकरौदा गावात एक कुटुंब अगदी शांतपणे झोपलं होत.

त्यावेळी एक उंदीर तिथं आला आणि इथून तिथून उड्या मारू लागला. त्यामुळे कुटुंबालाही जाग आली. घरातील सर्व सदस्य उठले. त्यांना काहीसा विचित्र आवाज येऊ लागला. हा विचित्र आवाज ऐकताच, घर देखील हालत असल्याचं त्यांना जाणवलं. भीतीने कुटुंबातील पाचही सदस्यांनी घराबाहेर पळ काढला.

धावत ते घरातून बाहेर आले आणि काही मिनिटातच घर कोसळलं. समोर आलेल्या अधिक माहितीनुसार, कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त तेथे काही नातेवाईकही आले होते. सर्व जण वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. तेव्हा अचानक कुणावर तरी उंदराने उडी मारली आणि त्यानंतर सर्वजण हडबडून उठले.

त्याचवेळी कसला तरी वेगळाच आवाज आला. सर्वाना वाटल चोरच आला आहे. पण नंतर काहीच क्षणांत घर देखील हलू लागलं. तेव्हा ते घरातून बाहेर पडले. घरामागे बांधलेल्या जनावरांना देखील त्यांनी सोडलं आणि घरापासून दूर केलं. तेव्हाच घराच्या मागील भाग कोसळला. या सर्वांचे प्राण वाचवल्याचे श्रेय पिटकुल्या उंदराला मिळाले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *