झोपताना कधीच करू नका ‘या’ 4 चुका, पहा नंबर ‘4’ ची चूक कराल तर भोगावे लागतील ‘हे’ गं-भीर परिणाम..

आपण झोपताना साधारणत: चार पोझिशनमध्ये झोपत असतो. एक तर सरळ, डाव्या अंगावर, उजव्या अंगावर आणि पालथे अशा पोझिशन मध्ये आपण झोपत असतो. मात्र, झोपण्याचे देखील विविध वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे कुठल्या पद्धतीने झोपले पाहिजे. हेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरते.
आपण योग्य पद्धतीने झोपून आपले आरोग्य सांभाळू शकता. मात्र, आजकाल अनेकजण कशाही पद्धतीने झोपत असतात. त्यामुळे त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागते. आम्ही आपल्याला आज या लेखांमध्ये आशा पद्धती सांगणार आहोत की कुठल्या पद्धतीने झोपले पाहिजे.
१. साधारणत: आपले जेवण झाल्यानंतर अन्नपचन होण्याची प्रक्रिया सुरू होते. तरीदेखील जेवण झाल्यानंतर दोन तासांनी झोपावे, असा नियम आहे. मात्र, काही जण जेवण झाल्या झाल्या लगेच झोपतात. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम व्हायला लागतात. जर जेवण झाल्यावर झोपायचे असेल, तर तुम्ही डाव्या अंगावर झोपावे. डाव्या अंगावर झोपल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. तसेच डाव्या बाजूला असल्याने तुमचा रक्तदाब देखील संतुलित राहतो आणि शरीराचे तापमान देखील संतुलित राहते.
२. झोपताना सरळ कधीही झोपू नाही. यामुळे तुमच्या मणक्याच्या हाडांना धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे फक्त डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला झोपावे.
३. तुम्हाला पोटावर म्हणजेच पालथे झोपण्याची सवय असेल तर असे अजिबात करू नका. पोटावर झोपल्याने याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. पोटावर झोपल्यामुळे तुमचा शरीराचा भार हृदयावर व छातीवर येतो. त्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी आजाराला सामोरे जावे लागू शकते.
४.जगातील 75 टक्के लोक हे गुडघे जवळ करून झोपतात, असे निदर्शनास आले आहे. मात्र, असे झोपणे हे अतिशय घातक ठरू शकते. गुडघे जवळ करून झोपल्याने तुमच्या गुडघ्याची समस्या निर्माण होऊ शकते. तर आपल्याला असे झोपल्याशिवाय झोपच येत नसेल तर त्यावर उपाय म्हणजे आपण दोन्ही गुडघ्यामध्ये उशी ठेवू शकता. यामुळे तुम्हाला इतर आजारांचा सामना करावा लागणार नाही.