झोपण्यापूर्वी फक्त ‘1’ खजूर खा, ‘हे’ 3 आजार कायमचे होतील दूर, आणि शरीराला होतील ‘हे’ 8 फायदे

चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर आपल्याला सुका मेवा खायला सांगतात. काजू, बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, काळे मनुके यांचे नियमित सेवन केल्याने फायदा होतो. यात पोषणमूल्य जास्त असल्याने प्रतिकारशक्ती देखील वाढते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मात्र हे खाण्याच्या योग्य वेळा आणि प्रमाण माहिती असल्यास याचा अधिक फायदा होतो.
आज आपण खजूर खाण्याचे 8 फायदे जाणून घेणार आहोत.
मधुमेहाचा धोका कमी होतो : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खजूर महत्वाची भूमिका बजावते. आठवड्यातील दोन ते तीन दिवस खजुराचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.
चेहऱ्यावर तेज : खजुरात अँटी ऑक्सीडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे चेहरा आणि शरीरावरील त्वचेवर तेज निर्माण होते. तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढते.
फायबरचे भांडार : फायबरयुक्त पदार्थात खजुराला वरचे स्थान आहे. खजुरात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. फायबर मुख्यत्वे पचन क्रिया आणि पोटाच्या समस्या कमी करण्याचे काम करते.
हृदयरोगाचा धोका कमी : देशात दर वर्षी हृदयाशी निगडित आजारने लाखो लोकांचा मृत्यू होतो. खजुराच्या सेवनामुळे याचा धोका कमी होतो. कारण यात कॅरोटेनॉईड आणि फिनोलीक ऍसिड हे घटक आढळतात.
बुद्धी होते तेज : मेंदूशी निगडित कार्यपद्धती उत्कृष्ट करण्यासाठी आणि सक्रियता वाढवण्यास खजूर हातभार लावतात. यामुळे मेमरी पॉवर बुस्ट होण्यास मदत होते.
गर्भावस्थेत खजूर खाणं फायदेशीर : गर्भावस्थेत वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले जाते. एका संशोधनात गर्भावस्थेत खजूर खाणे बाळ आणि आई या दोघांसाठी फायदेशीर असल्याचे निदर्शनास आले. याच्या सेवनामुळे लेबर पेन कमी होते असे दिसून आले.
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतो : उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) ची समस्या नियंत्रणात ठेवण्यास खजुरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक लाभदायक ठरतात. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी एक ग्लासभर दुधात दोन खजूर मिसळून याचे सेवन करावे. तसेच नियमित खजूर खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राखण्यास मदत होते
हाडांना मिळते मजबुती : हाडांना मजबूत करण्यात खजूर महत्वाची भूमिका निभावते. यात फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. झोपेपूर्वी दुधासोबत याचे सेवन केल्याने झोपही चांगली लागते. ज्यांना कफचा त्रास आहे त्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचे सेवन करावे.