झुरळ आणि पाल घरातून बाहेर पळवून लावण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, पहा ‘3’ रा उपाय सर्वात सोपा

उन्हाळा सुरू होताच बीडे आणि छिद्रांमध्ये लपलेले किडे बाहेर येतात. पुस्तके ठेवण्याचे कपाट असो वा कपड्यांचे कपाट असो, नाहीतर भिंतींवर हे पाल आणि झुरळे कोठेही सापडतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत, ज्याद्वारे ते तुम्ही घरांपासून दूर ठेवू शकता
कांदे: पाल आणि झुरळ यांना कांद्याचा वास आवडत नाही. तर त्यांना घरापासून दूर ठेवण्यासाठी कांद्याचा रस शिंपडा. त्यामुळे पाल आणि झुरळ घरात येणार नाही.
कॉफी दाणे : हे आपल्या घरातून झुरळे आणि पाल बाहेर फेकण्यास खूप उपयुक्त आहेत. झुरळांपासून मुक्त होण्यासाठी घरात वेगवेगळ्या ठिकाणी लहान प्लेट्समध्ये कॉपीचे दाणे ठेवा.
बोरॅक्स आणि साखर: झुरळांपासून मुक्त होण्यासाठी 3 भाग बोरॅक्समध्ये १ भाग साखर मिसळा आणि झुरळे दिसतील तेथे फवारणी करा. यामुळे काही तासांत झुरळे गायब होतील.
लसूण: पाल देखील लसणाच्या वासापासून दूर पळतात. पलीपासून सुटका मिळवण्यासाठी हा एकदम उपयुक्त उपाय आहे. यासाठी तुम्हाला ज्याठिकाणी जास्त प्रमाणात पाली आहेत त्याठिकाणी फक्त लसणाच्या पणायची फवारणी करायची आहे किंवा ज्या ठिकाणी पाली आहे ठिकाणी फक्त दोन चार लसणाच्या कळ्या टांगा पाली कधीच तुमच्या घरात येणार नाही.
अंडीचे टरफले: अंडीचा येणाऱ्या वापसपासून देखील पाल घरात येत नाहीत. दारे, खिडक्या आणि घरात प्रवेशद्वारांवर अंडी टरफले ठेवल्यामुळे पाली घरात प्रवेश करत नाहीत.
कॉफी आणि तंबाखूच्या गोळ्या: कॉफी आणि तंबाखू पावडरच्या लहान गोळ्या बनवा आणि माचीस किंवा टूथपेस्ट सारखे बनवून. त्यांना कापटमध्ये किंवा अशा ठिकाणी लावा जिथे पाली जास्त असतात. हे मिश्रण त्यांच्यासाठी घातक असते आणि यामुळे त्या पाली मरण पावतात, म्हणून नंतर तुम्हाला त्यांना बाहेर फेकावे लागेल.
नेफ्थलीन बॉल: पाली मारण्यासाठी नेफॅथलीन बॉल वापरणे देखील खूप प्रभावी आहे. आपण आपल्या स्वयंपाकघरातील शेल्फ्स, इत्यादींमध्ये ठेवू शकता जेणेकरून पाली तिथे पोहोचू शकणार नाही.
अमोनिया आणि पाणी: अमोनिया आणि पाण्याचे मिश्रण (पाण्याच्या बादलीत दोन कप अमोनिया) पुसून अमोनियाच्या वासामुळे झुरळ घरात प्रवेश करत नाही. घराला झुरळांपासून मुक्त ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा ही प्रक्रिया करा.