ज्या सुदर्शन चक्राला कुणी थांबवू शकत नव्हते त्याला द्रौपदीने थांबविली होते…

ज्या सुदर्शन चक्राला कुणी थांबवू शकत नव्हते त्याला द्रौपदीने थांबविली होते…

कृष्ण हा नारायणाचा सर्वात मोठा अवतार होता. नारायणाने कृष्णाच्या रूपातबालपणात केलेल्या क्रीडा ह्यामुळे, आपल्यापैकी सर्वांनाच नारायणाचे हे रूप अतिशय लाघवी आणि मोहात पडणारे ठरते. नारायणाचे हे रूप जितके जास्त मोहक आहे तितकेच ते विध्वसंक देखील आहे. ज्यावेळी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर कृष्णाने केला आहे त्यावेळी, विध्वंस झाला असे आपण बघितलेच आहे.

कृष्णाच्या हातून जसे सुदर्शन निघते, तसे विध्वंस हा होतोच. एकदा निघालेले सुदर्शन थांबवणे स्वतः कृष्णाच्या हातात देखील नसते. मात्र ते सुदर्शन द्रौपदीने थांबवले होते… अर्जुनाने कांपिल्यानगराचा राजा द्रुपद ह्याचा पाराभव केला होता. शिखंडीनी हिला आशीर्वाद होता कि, भीष्माच्या मृत्यूचे कारण तीच ठरणार आहे. त्यामुळे, द्रुपद राजाने अतिशय उत्तम पद्धतीने तिचा सांभाळ करत तिला योद्धा बनवले होते. मात्र राजकुमार अर्जुन ह्यांच्याकडून तिला देखील हरावे लागले होते.

आपल्या झालेल्या पराभवाचा अपमान द्रुपद राजाच्या मनात सलत होता. इतकी शूर पुत्री, तिला इतके महान योद्धा बनवून देखील पराभवाचा सामना करावा लागला. ह्याचे कारण आपल्याला पुत्र नाहीये, असे म्हणून राजा द्रुपद ह्याने महान ऋषी आणि महर्षींना आपले मनोगत व्यक्त केले. एका पुत्रप्राप्तीची आशा आहे, जो द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशी प्रार्थना द्रुपद ह्याने महर्षींकडे केली होती.

द्रुपदला एका पुत्राची प्राप्ती होऊ शकते, मात्र त्यासाठी त्यापुत्राबरोबर एका पुत्रीचा स्वीकार देखील त्याला करावा लागणार होता. राजा द्रुपद ह्याने ती गोष्ट मान्य केली आणि भव्य यज्ञाचे आयोजन केले गेले. द्रुपद राजाने, आपल्याला हव्या त्या सर्व सर्वोत्तम गोष्टींची आहुती त्य्या यज्ञामध्ये दिली आणि आपल्याला हवा असलेला शूर आणि पराक्रमी पुत्राची प्राप्ती केली.

आपल्याला हवे असलेला पुत्र देवतांकडून यज्ञातून प्रकट होताच, द्रुपद आपल्या पुत्राला म्हणेजच दृष्टदृमन्य ह्याला घेऊन जाऊ लागला आणि आता मला काहीच नको तेव्हा हा यज्ञ तुम्ही येथेच थांबवा असे त्याने ऋषींना आवाहन केले. द्रुपद ची पुत्री म्हणून, देवता विशेष प्रसाद स्वरूप आणि संपूर्ण आर्यव्रत चे भवितव्य बदलण्याची ताकत असणारी द्रौपदी हीचा जन्म होणार होता. म्हणून द्रुपद निघून जात असताना, देवतांनी आपल्या पवित्र अग्नीने त्याला अडवले.

त्यामुळे मनात नसताना देखील, द्रुपदने यज्ञामध्ये आहुती दिली. जितके सुख तेवढेच दुःख, जितके अप्रतिम सौंदर्य तेवढेच त्यावर लागणारे ग्रहण, संपूर्ण वेद-पुराण आणि शास्त्रांमध्ये पारंगत तेवढीच पदोपदी तिच्या सत्वाची परीक्षा घेतली जावी… अश्या प्रकारची आहुती द्रुपद राजाने यज्ञामध्ये दिली… आणि त्यानंतर द्रौपदीचा जन्म झाला…

मात्र, द्रुपद राजाने द्रौपदीचा स्वीकार केला नाही. एक नाही तर अनेक वेळा, तिचा अपमान केला. जेव्हा द्रुपद आपल्या पुत्राला म्हणेजच दृष्टदृमन्य ह्याला घेऊन द्रोणाचार्यावर युद्ध करण्यास जाऊ लागला, तेव्हा द्रौपदीने आपल्या पित्याला अडवले. आपल्याच मित्रासोबत युद्ध करणे हे अतिशय चुकीचे आहे, आणि त्यामुळे कोणाचेच भले नाही होणार असे द्रौपदी हिने आपल्या पित्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘मला तुझी गरजच नव्हती. तू जबरदस्ती मला देवतांकडून देण्यात आली आहेस. तसेही मला काहीही सांगण्याचा तुला हक्कच नाहीये. तुला हवे तर तू माझ्या ह्या नगरातून जाऊ शकतेस,’ असे बोलत द्रुपद राजाने थोडक्यात तिला नगर सोडून जाण्याचा आदेश देत तिचा त्यागच केला.

द्रौपदीने आपल्या नगराचा त्याग केला आणि बाहेर जाऊन थांबली. एका टेकडीवर उभी असताना ती गंभीर विचारात मग्न होती, आणि तेवढ्यात तिथे कृष्ण आला. आपण संपूर्ण कांपिल्य प्रदेश जिंकून राजा द्रुपद ह्याचा पराभव करणार आहे असे त्याने तिला सांगितले. तसे तर फक्त एक व्यक्ती संपूर्ण सैन्यासोबत युद्ध कसे जिंकेल, शिवाय आपले पिता द्रुपद हेदेखील शूर योद्धा आहेत आणि दृष्टदृमन्य तर देवतांचा प्रसाद म्हणून पराक्रम आणि शौर्य घेऊनच जन्मला आहे मग आपल्या पित्याचा पराभव अश्यक्यच आहे; असा विचार द्रौपदीने केला.

परंतु, बोलत असताना कृष्णाच्या चेहऱ्यावर चमत्कारिक तेज दिसत होते. त्याचा आत्मविश्वास बघून द्रौपदीला थोडी शंका उत्पन्न झाली आणि न राहवून आपल्या पित्याच्या राजभवनाकडे तिने पुन्हा धाव घेतली. तिथे पोहोचली तेव्हा चित्र भयानक होते. एकट्या कृष्णाने संपूर्ण सैन्याला हरवले होते. दृष्टदृमन्य ह्याला कोणत्या तरी चमत्कारिक बाणाने बांधून ठेवले होते आणि कृष्णाचे कोणते तरी अतिचमत्कारिक म्हणजेच सुदर्शन चक्र आपल्या पित्याकडे निघालेले तिने पहिले.

क्षणाचाही विलंब न करता द्रौपदी आपल्या पित्यासमोर जाऊन उभी ठाकली आणि मनातून देवाची प्रार्थना करत ते चक्र थांबावे अशी आराधना केली. तिच्या मनाचा भाव अत्यंत शुद्ध होते आणि त्यागाची भावना हृदयाच्या अंतःकरणामधून आली होती म्हणून ते सुदर्शन चक्र थांबले.

द्रौपदी म्हणजेच पुत्रीचे महत्व द्रुपद राजा आणि संपूर्ण विश्वाला समजावे म्हणून, कृष्णाने रचलेली हि एक लीला होती. वेळप्रसंगी, आपले पिता, आपला भाऊ अर्थातच आपले कुटुंब सुरक्षित राहावे ह्यासाठी एक मुलगी कोणत्याही बिकट परिस्थितीचा सामना करू शकते,हे कृष्णाने सांगितले. मात्र, आपल्या मनाच्या शुद्ध भावनेने आणि त्यागाने कृष्णाचे सुदर्शन देखील द्रौपदीने अडवले होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *