चेहऱ्यावरील ग्लो वाढवायचा असेल तर झोपण्यापूर्वी करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय..

बऱ्याचदा पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुमचा चेहरा सकाळी थकलेला आणि उतरलेला दिसतो. जर तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर नेहमी नॅचरल ग्लो हवा असेल तर तुम्ही यासाठी पुढील ट्रीक ट्राय केल्या पाहिजेत.
1. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी 1 ग्लास पाणी प्या.
2. आहारात गाजरांचा समावेश करा. यामध्ये व्हीटॅमिन K, C, E, A आणि B चे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे त्वचेवरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते.
3. आपण बऱ्याचदा झोप व्यवस्थित घेत नाही त्याचा फटका आपल्या त्वचेला बसू शकतो.
त्यासाठी पूरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. त्वचेला ग्लो येण्यासाठी ती महत्त्वाची भूमिका बजावते.
दुध आपल्या शरीरासाठी पोषक असते. तसेच त्यात असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचा निरोगी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही त्याचा फेस पॅक म्हणून वापर करू शकता. कच्च्या दूधात मध मिसळून तुम्ही त्याचा फेस पॅक करू शकता. तसेच तो फेस पॅक 10 ते 15 मिनिटे लावून ठेवला पाहिजे.
जर तुम्हाला तुमचे ओठ मुलायम आणि सुंदर दिसणे अपेक्षित असेल तर तुम्ही त्यासाठी रात्री झोपताना टुथब्रशने ओठांवरील डेड स्कीन रगडून स्वच्छ केली पाहिजे. त्यानंतर ओठांवर बदामाचे तेल किंवा मध लावून झोपले पाहिजे.