चेहऱ्यावरील अनावश्यक केस कायमचे काढण्यासाठी वापरून पहा ‘हा’ फेस पॅक..केस होतील मुळापासून नष्ट…!

अनेकदा महिला या ब्युटी पार्लरमध्ये जात असतात. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ते ब्लिच करत असतात. तसेच आपल्या चेहऱ्यावर कुठेही केस राहू नये, यासाठी त्या आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यासाठी नानाविध उपाय देखील तयार करत असतात. महिलांना नीटनेटके राहणे हे खूप आवडत असते. या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांना मात्र ब्युटी पार्लर किंवा इतर काही गोष्टी माहीत नव्हत्या.
मात्र, काळानुरूप हा बदल देखील गावाकडे आता होत आहे. गावागावात आता ब्युटी पार्लर मोठ्या प्रमाणात झालेली आहे. गावात देखील महिला या ब्युटी पार्लरमध्ये जात असल्याचे आता दिसत आहे. चेहऱ्यावरील अवांतर केस काढणे हा प्रश्न महिलांसमोर फार मोठा असतो. अनेक महिलांच्या चेहऱ्यावर असे अवांतर केस असतात.
मात्र, त्या हे केस काढत नाही. त्यामुळे त्या बेढ प दिसत असतात, तर काही महिला या जुन्या विचाराच्या असतात. त्यामुळे त्या चेहऱ्यावरील असे केस कधीही काढत नाही. मात्र, त्यांचे चारचौघात गेल्यानंतर हसू होत असते.आज आम्ही आपल्याला असाच एक घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावरील काळे केस, डाग, मुरूम हे कमी करू शकतात. त्याचप्रमाणे आपण चेहरा आपला चमकदार देखील करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया नेमका काय उपाय करायचा आहे ते.
यासाठी लागणारे पदार्थ
1-ओट्स : ओट्स आपण कधी ना कधी खाल्ले असतील. मात्र, अनेकांना हा प्रकार माहिती नसतो. ग्रामीण भागांमध्ये ओट्स कोणीही खात नाही किंवा अनेकांना ते माहिती नसते. तर ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे भरलेले असतात. त्यामध्ये प्रोटीन असतात. तसेच त्वचेसाठी लागणारे इतर गुणधर्म देखील असतात. हा उपाय करण्यासाठी आपण ओट्स घेणार आहोत.
2-लिंबू: हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लिंबू लागणार आहे. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व भरलेले असते. तसेच लिंबूमध्ये अँटी बॅक्टरियल असते. त्यामुळे आपली त्वचा ही चांगली तजेलदार दिसण्यासाठी मदत होते.
असा करा उपाय
सुरुवातीला आपण ओट्स हे बारीक करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकावा. हे मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आपण पहिल्यांदा आपला चेहरा क्लीझरने पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर आपण हे मिश्रण आपल्या चेहर्यावर लावावे. हे मिश्रण दहा मिनिटे तसेच ठेवावे. दहा मिनिटानंतर हे मिश्रण आपण थंड पाण्याने धुऊन टाकावे.
त्यानंतर आपण आपल्या चेहऱ्यावर 10 मिनिटे मास्क ठेवावा. आपल्याला घाम आल्यानंतर आपण हा मास्क काढून टाकावा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील बारीक केस, काळे डाग, मुरूम कमी होतील. त्याप्रमाणे आपली चेहऱ्याची चमक देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. हा उपाय आपल्याला पंधरा दिवस करावा लागेल.