चित्रपटात व्हिलनचा रोल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्यावर आली आजारी आईला पाठीवरून नेण्याची वेळ…पहा Video

चित्रपटात व्हिलनचा रोल करणाऱ्या ‘या’ अभिनेत्यावर आली आजारी आईला पाठीवरून नेण्याची वेळ…पहा Video

अमरीश पुरी, ओम पुरी, प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी खलनायकाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक अभिनेता म्हणून त्यांना प्रेक्षकांनी नाकारलं असलं तरीही, खलनायकाच्या भूमिकेत या अभिनेत्यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. सिनेमांमध्ये विलनच्या भूमिकेत दिसणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे असतील, याबद्दल कायमच सर्वांना कौतुहल असते.

अनेक वेळा बघितले गेले आहे की सिनेमांमध्ये विलन ठरणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात रियल हिरो पेक्षा कमी नसतात. सोनू सूद याने खलनायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. केवळ बॉलीवूडच नाही तर, साऊथमध्ये देखील एक लोकप्रिय खलनायक म्हणून सोनू सूदला ओळखले जाते.

मात्र को’रोना काळात त्याने केलेले समाजकार्य बघून हाच खरा हिरो, असे अनेकांनी म्हटले. असे अनेक कलाकार असतात जे कायम प्रकाशझोतापासून दूर राहून आपले सर्वसामान्य आयुष्य जगत असतात. कधीकधी हे कलाकार असं काही करतात की, ज्यामुळे त्यांचे तोंड भरुन कौतुक करावेसे वाटते. अशाच एका खलनायकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सूर्यवंशी, सिंबा, दबंग अशा बॉलीवूडच्या बऱ्याच सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता प्रदीप काबरा, आपल्या खऱ्या आयुष्यात खरोखरच एका हिरो पेक्षा कमी नाही. आजच्या धावपळीच्या जगात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरी भागात आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणे, हे काय खूपच साधारण आहे.

मात्र असेही काही लोक आहेत जे आजही आपल्या आई-वडिलांची सेवा करण्यातच जीवनाचे खरे सार्थक समजतात. आणि असंच काही प्रदीप काबरा यांच्या बाबतीत देखील बघायला मिळाले. प्रदीपने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तामिळ चित्रपटांपासून केली होती. साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याचं मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्ये देखील त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत.

एक उत्तम खलनायक म्हणून प्रदीप काबराने वॉन्टेड, दिलवाले, बागी या चित्रपटात काम केले आहे. मात्र प्रदीप लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करतो. शूटिंग संपताच तो करीत आपल्या घरी येऊन आईच्या सेवेत मग्न होऊन जातो. पुराणातील पुंडलिक असो किंवा श्रवण बाळ यांच्या कथा आणि माता-पित्याची सेवेसाठी त्यांनी केलेले अपरिमित कष्ट आपण सर्वांनीच ऐकले आहे.

आजच्या जगात देखील असे श्रावणबाळ असू शकतात हेच प्रदीप काबरा यांनी दाखवून दिले आहे. प्रदीप काबरा यांच्या इंस्टाग्राम अकाउंवर त्यांच्या आई सोबतचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील. दहा वर्षांपूर्वी त्याच्या आईला पॅरॅलिसिस झाला होता. तेव्हापासून प्रदीप आपल्या आईची सेवा करतोय. आपल्या आईने अगदी पूर्वीसारखे सर्वसामान्य जीवन जगावं, यासाठी तो रात्रंदिवस खपत आहे.

रोज न चुकता आपल्या आईला पाठीवर बसून समुद्रकिनारी घेऊन जातो. तिथे जाऊन आईकडून थेरपी सेशन करून घेतो. घरी तिचे पाय चोपून देण्यापासून, अगदी तिला जेवण भरवण्यापर्यंत सगळं काही काम तो स्वतःच करतो. त्यामुळे प्रदीप काबरा खरोखरच खऱ्या आयुष्यात हिरोपेक्षा कमी नाही. सध्या त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *