चिकन धुवून खात असाल तर सावधान ! होऊ शकता ‘हे’ गंभीर आजार ….

आपल्या देशात देखील चिकप्रेमींची मोठी संख्या आहे. आज मां’साहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चिकन आवडतेच. चिकनचे वेगवेगळे पदार्थ म्हणजे या लोकांसाठी पर्वणीच. आपल्या देशातील घरापैकी प्रत्येक तिसऱ्या घरात रविवारी ‘चिकन बिर्याणी’ तर हमखास बनवलेच जाते.
चिकनला एक हेल्दी पदार्थ म्हणून देखील समजलं जाते. जिम प्रेमींसाठी देखील चिकन सर्वात खास पदार्थ ठरतो. लहान मुलं देखील चिकन आणि त्यापासून बनलेले पदार्थ अगदी आवडीने खातात. प्रोटिन्सने युक्त चिकन हेल्दी पर्याय आहे. अनेकांनी चिकन अति जास्त प्रमाणात खाणे, शरीरासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे.
तर, अनेकांनी प्रमाणात रोज चिकन खाणे शरीरासाठी उत्तम असल्याचं म्हणलं आहे. आपल्या कुटुंबाला कोणताही पदार्थ खाऊ घालण्यापूर्वी आपण सर्व गोष्टीचा सारासार विचार करूनच खाऊ घालतो. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला हेल्दी ठेवण्याकडेच जास्त कल ठेवतो. त्यामुळेच बाजारातून चिकन आणले की, सर्वात पहिले आपण ते धुवून घेतो.
मात्र, आता नुकतंच समोर आलेल्या रिसर्च नुसार चिकन धुणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. होय. चकित होणारे उत्तर असले तरीही, चिकन बाजारातून घरी आणल्यानंतर ते धुवू नका. चिकन धुतल्याने तुमच्या शरीराचे खूप जास्त नुकसान होऊ शकते. जगभरातील विविध फूड सिक्योरिटी अथॉरिटी आणि रेग्युलेटरी शिफारस करतात की चिकन शिजवण्यापूर्वी धुवू नये, असा अहवाल द कॉन्व्हर्सेशनने नुकतंच प्रदर्शित केला आहे.
चिकन किचन मध्ये धुतल्याने स्वयंपाकघरात बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो. हे बॅक्टरीया शरीरासाठी खूप जास्त हानिकारक ठरतात. त्यामुळे चिकन न धुता शिजविणे कधीही चांगले आहे. ही पद्धत सर्वात सुरक्षित मानली जाते. मात्र ही पद्धत अनेकांना ठाऊकच नाहीये. चिकन खाण्याबद्दलची ही नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फूड सिक्योरिटी इन्फॉर्मेशन काउंसिलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ऑस्ट्रेलियातील अर्धी लोकं चिकन शिजवण्यापूर्वी चिकन धुतात. सुमारे २५ टक्के ग्राहक चिकन धुतात. संशोधनानुसार, साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टर या दोन महत्त्वाच्या जीवाणूंमुळे अन्नजन्य रोग होतात. हे दोन्ही जीवाणू कोंबडीच्या मांसावर आढळतात.
जेव्हा आपण चिकन धुतो त्यावेळी हे जिवाणू आजूबाजूला पसरतात आणि आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आता पुढल्या वेळी चिकन आणल्यानंतर, ते घरात धुवून घेऊ नका. आणि आणले तसेच शिजायला टाका.