घाम येणं चांगलं कि वाईट? एका वर्षात व्यक्तीच्या शरीरातून किती घाम निघतो ? वाचून चकित व्हाल..

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगवेगळी असते. त्यामुळे, वेगवेगळ्या परिस्थतीमध्ये, शरीर वेगवगेळ्या पद्धतीने रिऍक्ट करते. कधी कोणाला जास्त थंडी वाजते, तर कधी कोणाला खूप जास्त गर्मी होते. वातवरण कसे आहे याचा परिणाम तर अर्थात प्रत्येकाच्या शरीरावर होतच असतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या शरीरामध्ये होणारे व झालेलं बदल त्यासाठी कारणीभूत असतात.
अनेकांचे शरीर मूळतः उष्ण असते, तर काहींचे शरीर थंड असते. त्यावर आता वेगवेगळे उपाय डॉक्टरांकडून सांगण्यात येतात. मात्र, शरीराची मूळ स्थिती शक्यतो बदलणे अवघड असते. याचप्रकारे, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या आवश्यकता देखील वेगवेगळ्या असतात. यामध्ये, आहार, पाणी या सर्वांचाच समावेश आहे.
प्रोटिन्स, व्हिटॅमिन्सची पातळी प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या प्रमाणात असते. त्यामुळेच, प्रत्येकाची रोगप्रतिकार क्षमता देखील वेगळी असते. याच सोबत प्रत्येकाला रोज किती पाणी पिण्याची सवय आहे आणि त्यांच्या शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे हे देखील भिन्न असते. साधारण व्यक्ती दिवसातून ३-४ लिटर पाणी पितो.
पण डॉक्टरांचा कायमच सल्ला असतो, निरोगी राहायचं असेल तर जास्तीत जास्त पाणी पिले पाहिजे. ज्याप्रकारे, प्रत्येकाच्या शरीरात पाण्याची आवश्यकता वेगळी असते, त्याचप्रकारे पाणी बाहेर सोडण्याचे प्रमाण म्हणजेच घाम येण्याचे प्रमाण देखील वेगवेगळे असते. कधी-कधी कोणाला शांत बसलेलं असताना देखील घाम येत राहतो.
तर कधी-कधी, भरपूर शारीरिक श्रम करून देखील कोणाला घाम येतच नाही. प्रसंगी बघता, कोणाला कधी किती घाम येतो हे वेगवेगळ्या गोष्टींवर आधारित असते. महिलांमध्ये घामाच्या ग्लॅण्डस पुरुषांच्या तुलनेत अधिक असतात. त्यामुळे, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त घाम येतो. त्याचबरोबर, लठ्ठपणा आणि घाम या दोन्ही गोष्टी देखील एकमेकांवर अवलंबून आहेत.
समोर आलेल्या काही रिसर्च नुसार, लठ्ठ व्यक्तींना बारीक व्यक्तींच्या तुलनेत जास्त घाम येतो. पण हे सर्वांच्याच बाबतीत असते असे नाही. बऱ्याच वेळा बारीक व्यक्तींना देखील जास्त घाम येत असतो. सोबतच, ज्यांना हाय बीपीचा त्रास असतो त्यांना देखील घाम जास्त येतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना हृदयाचे विकार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा घाम येण्याचे प्रमाण जास्त असते.
व्यायाम करताना किंवा शारीरिक श्रमाचे काम करताना देखील घाम येतो. मात्र कधी विचार केला आहे का, की या घामाचे मोजमापन देखील होऊ शकते. तसे बघता, घाम निघणे हे शरीरासाठी चांगलेच समजले जाते. स्किनकेअर फर्म निवियाने आता, एक व्यक्तीच्या शरीरातून वर्षभरात किती घाम बाहेर पडतो याचा आकडा सांगितला आहे. २७८ गॅलन म्हणजेच १२६४ लिटर घाम एका व्यक्तीच्या शरीरातून, साधारण एका वर्षांमध्ये बाहेर पडतो असं रिसर्च टीमने सांगितले आहे. त्यात, जर व्यक्ती जास्त व्यायाम किंवा शारीरिक श्रम करत असेल तर हे प्रमाण अजून जास्त वाढते.