घशात मासळीचे काटे अडकल्यास करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…

घशात मासळीचे काटे अडकल्यास करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…

भारतीय आहार शास्त्रांमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक शाकाहारी आणि दुसरे मां-साहारी.भारतामध्ये मां-साहारी पदार्थ हे अतिशय चवीने खाल्ले जातात. मां-साहारी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात आहे. असे असले तरी मासळी खाण्याला अनेक जण विरोध देखील दर्शवतात.

मात्र, अनेक लोक मासळीचे सेवन करत असतात. यामध्येच मासळी खाणाऱ्यांचे प्रमाणदेखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. मासळी खाण्याचे खूप मोठे उपयोग देखील आहेत. मात्र, मासळी खाताना खूप मोठी काळजी घ्यावी लागते. मासोळीमध्ये काटे असतात. त्यामुळे मासे खाताना काळजी घेऊनच खावे त्यामुळे आपल्याला हानी पोहोचू शकते.

मासळीमध्ये अमेगा, प्रोटीन, व्हिटॅमिन हे मोठ्या प्रमाणात असते. तसेच मासे सेवनामुळे आपल्या डोळ्यांना देखील मोठा उपयोग होतो. त्यामुळे मासळीचे सेवन नियमितपणे करावे, असे अनेक डॉक्टर सांगत असतात.

मात्र मासळी खाताना जर आपल्या घशामध्ये काटे रुतले असतील तर याचा फार मोठा त्रा-स आपल्याला होतो. आपल्या तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. मात्र, असे असले तरी आपण घशात मासेचे काटे अडकल्यास आपण तातडीने घरगुती उपाय करून यावर मात करू शकता.

1) भाताचा गोळा : जर आपण मासळीचे सेवन करत आहात आणि आपल्या घशामध्ये काटे अडकल्यास आपल्याला फार मोठा त्रा-स सहन करावा लागतो. अशावेळी आपण तातडीने घरगुती उपाय करू शकता.थोडासा भात हातात घ्यावा आणि त्याचा गोळा तयार करावा हा गोळा खावा. यासोबतच घशात अडकलेले काटे हे निघून जातात आणि आपल्याला आराम पडतो. हा प्रयोग दोन तीन वेळेस करावा. यामुळे आपल्याला आराम निश्चित पडतो.

2) केळी : जर मासोळी खाताना आपल्या गळ्यात काटे अडकले असल्यास आपण तातडीने केळीचे सेवन करावे. दोन-तीन केळी खावी. यामुळे आपले काटे निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. हा उपाय आपण करून गळ्यात अडकलेली मासळीचे काटे निश्चितपणे काढू शकतो.

3) कोमट पाण्यात ब्रेड मिसळा : ही प्रक्रिया केळी खाण्यासारखीच आहे. यासाठी ब्रेड घ्या आणि कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा. ब्रेड वितळल्यावर हे मिश्रण प्या. अशाप्रकारे, ब्रेड आणि दूध किंवा पाण्याचा मऊपणा घशात अडकलेले काटे काढून पोटात घेऊन जातात.

4) जोरदार खोका : माशाचा काटा तुमच्या घशात अडकला आहे असे समजताच प्रथम जोरात खोकायला सुरूवात करा. आपण असे जोऱ्यात खोकल्यामुळे माशांच्या काट्यांना गळ्या खाली जाण्यापासून रोखू शकता. बर्‍याचदा असे घडते की जर आपण काही मिनिटांसाठी खूप खोकतो तर यामुळे घशात अडकलेला काटाच्या विपरीत जोर दिल्याने काटा बाहेर येऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *