मृ’त कुटुंबियांच्या खात्यातून किंवा ATM मधून पै’से काढत असाल तर सावधान ! भोगावे लागतील ‘हे’ परिणाम..

मृ’त्यू कधी कोणाला सांगून येत नाही.मात्र, आयुष्याचे वास्तव म्हणून मृ’त्यू’कडे बघितले जाते. ज्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला आहे, त्याच्याबद्दल नक्कीच दुःख असते. पण त्याच्या कुटुंबियांबद्दल मोठी सांत्वना असते. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जेव्हा मृ’त्यू पावते, तेव्हा त्या धक्क्यातून सावरायलाच अनेक दिवस जातात.
त्यातून, सावरता आले किंवा नाही तरीही काही महत्वाच्या गोष्टींचा सामना मात्र आपल्याला करतच राहावा लागतो. काही कायद्याशी निगडित कागदपत्र, प्रॉपर्टी संदर्भातील प्रक्रिया या सर्व करणे अनिवार्य असते. याच सोबत, बँके खात्याचे देखील काही महत्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन करणे महत्वाचे ठरते. मृ’त व्यक्तीचे बँक खाते चालू ठेवणे पूर्णपणे,बेकायदेशीर आहे.
मृ’त व्यक्तीच्या बँक खात्यामधुन कोणत्याही प्रकारे, म्हणजे बँकेतून रक्कम काढणे किंवा ATM मधून रक्कम काढणे कायद्याने गु’न्हा आहे. असे करताना आढळल्यास गु’न्हा दाखल होऊ शकतो. संबंधित व्यक्ती, त्या मृ’त व्यक्तीच्या बँक खात्याचा नॉमिनी असला तरीही,आरबीआयच्या सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ पर्यंत कोणीही त्या खात्यातून एक रुपया देखील काढू शकत नाही.
आणि असे केलेच तर त्यामुळे धोकाधाडीचा खटला देखील संबंधित व्यक्तीवर चालू शकतो. काही दिवसांपूर्वी एक असंच प्रकरण समोर आले. एका व्यक्तीने आपल्या मृ’त पत्नीच्या खात्यामधून काही रक्कम काढली. मात्र, त्वरित याबद्दलची माहिती बँक कर्मचाऱ्यांना लागली आणि त्यानंतर त्याला मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले. तेव्हा RBI कडून देण्यात आलेल्या नियमांबद्दल एकदा जाणून घेऊ या.
नियम काय आहे?
यामध्ये कायदा सांगतो की, या प्रकारची प्रकरणे बँक आणि इतर कायदेशीर वारसांना फसवण्यासमान आहे. अशा प्रकारच्या परिस्थितीत पोलीस तक्रार दाखल होऊ शकते आणि या आरोपाखाली दं’ड देखील होऊ शकतो. जर मृ’त व्यक्तीने आपल्या बँक खात्यात एकाहुन अधिक नॉमिनी नोंदवले असतील आणि त्यांच्यापैकी एखादी व्यक्ती त्या पैशाचा वापर करत असेल तर, त्या व्यक्तीला नॉमिनीकडून सहमती घेऊन बँकेत दाखल करणे अनिवार्य आहे.
हे लक्षात ठेवा:-
मृ’ताचे बँक अकाऊंट संयुक्त होते की एकट्याचे होते, हे एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाला तर हे सर्वात पहिले जाणून घेणे महत्वाचे ठरते. यानंतर नॉमिनीचे नाव नोंदले होते किंवा नाही याबद्दलची माहिती घ्या. एखाद्या बँक अकाऊंट होल्डरचा मृ’त्यू झाला तर त्याच्यापश्चात त्याचे कुटुंबिय बँक खात्यातील रक्कमेवर आपला दावा करू शकतात.
बँक खाते बंद करण्यासाठी काय कराल? :-
मृ’त व्यक्तीचे नोटराईज्ड डे’थ सर्टिफिकेट, बँकेत देऊन बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज करावा लागतो. नॉमिनी जो कोणी असेल तर त्याला सहजपणे सर्व पैसे मिळतील,त्यानंतर ते पैसे तो वारसांकडे सोपवेल. परंतु एखाद्या वेळेस जर, नॉमिनी नसेलच तर, कुटुंबातील सदस्य जो वारस असेल तो डे’थ सर्टिफिकेट बँकेत देऊन आपले आणि मृ’त व्यक्तीच्या नात्याशी संबंधीत कागदपत्रे सादर करेल. मग सर्व प्रक्रियानंतर त्याला ते पैसे मिळू शकतात. बँक इंडेमनिटी बाँडची सुद्धा मागणी करू शकते.
हे आहेत RBI चे निर्देश:-
आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकने, बँकांना अशा प्रकरणांत नरमाईचे धोरण ठेवण्यास सांगितले आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृ’त्यू’नंतर, संपूर्ण माहिती बँकेला देण्यासाठी काही ठराविक असा कलावधी ठरलेला नाही. पीडित जेव्हापण मानसिकरित्या तैयार होईल तेव्हा हे काम करू शकता. आरबीआयच्या निर्देशानुसार कुटुंबातील सदस्यांनी पैसे काढण्यासाठी अर्ज दिल्यानंतर, बँकेला सर्व प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण करावी लागते.