कौतुकास्पद ! वडीलांची इच्छा म्हणून घेतले कष्ट, किराणा दुकानदाराच्या मुलाची थेट भारतीय संघात निवड..

कौतुकास्पद ! वडीलांची इच्छा म्हणून घेतले कष्ट, किराणा दुकानदाराच्या मुलाची थेट भारतीय संघात निवड..

जिद्द आणि मेहनत यांची सांगड जेव्हा पण बसते, तेव्हा अनेक आश्चर्य नक्कीच घडतात. अशक्य अशा गोष्टी शक्य होतात. जेव्हा देखील असे उदाहरण समोर येतात, तेव्हा एक वेगळाच उत्साह संचारतो आणि आनंद देखील मिळतो. अशीच एक स्वप्नपूर्तीची घटना समोर आली आहे. या सुखद घटनने, पुन्हा एकदा संघर्षाचे महत्व सर्वाना पटवून दिले.

सध्या क्रिकेट वर्तुळात एका खास खेळाडूची चर्चा सुरु आहे. नुकतंच अंडर-19 वर्ल्डकप 2022 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यश धुलच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने 17 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. या सतरा जणांमध्ये एका नावाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. संपूर्ण क्रिकेट जगतात गाजियाबादच्या सिद्धार्थ यादवची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारतीय क्रिकेट संघात आपले नाव पक्के कारण्यासाठी सिद्धार्थला प्रचंड संघर्ष करावा लागला. आणि अखेर त्याच्या परिश्रमाच चीज झालं. सिद्धार्थचे वडील गाजियाबादच्या कोटगावमध्ये साधारण किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रवण यादव यांची देखील क्रिकेटर बनण्याची मनापासून इच्छा होती. पण असे असले तरीही ते नेट बॉलरच्या पुढे कधीच जाऊ शकले नाहीत.

मात्र आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ आपल्या वडीलांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी युएईमध्ये आशिया कप आणि वेस्ट-इंडीजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळणार आहे. सिद्धार्थचे वडील श्रवण म्हणाले की, ‘जेव्हा पहिल्यांदा सिद्धार्थने बॅट हातात घेतली होती तेव्हाच मला वाटले होते की तो एक उत्तम फलंदाज बनणार आहे. सोबतच तो डाव्या हाताने खेळतो म्हणून त्याच्यामध्ये फलंदाजीचे खास कौशल्य आहे.

मी केलेली तिच भविष्यवाणी सिद्धार्थने खरी करुन दाखवली. त्याने खूप मेहनत केली आणि आज तो भारताच्या अंडर- 19 संघाचा भाग आहे.’ सिद्धार्थने वयाच्या 8 व्या वर्षापासून आपली मेहनत चांगलीच वाढवली. याच मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात आपली जागा नक्की केली. याबद्दल बोलताना सिद्धार्थचे वडील श्रवण पुढे म्हणाले की, ‘रोज 3 तास दुकान बंद करुन सुरवातीच्या काळात मी त्याचा सराव घेत असे.

मी माझे दुकान दुपारी 2 वाजता बंद करायचो आणि मग आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मैदानात सरावा करत असे. सराव झाल्यानंतर संध्याकाळी पुन्हा दुकान सुरू करत होतो. क्रिकेटचा सराव करताना तो जास्त इतका थकायचा की त्याला भान राहत नव्हते. मात्र आमच्या कुटुंबातील सर्वांनीच त्याला साथ नाही दिली. त्याने अभ्यासात लक्ष घालावे अशी त्याची आजीची इच्छा होती.’

पुढे श्रावण सांगतात की, त्यांच्या कुटूंबियांना खास करून सिद्धार्थाच्या आज्जीला हे जुगार खेळण्यासारखेच वाटत होते. यामुळे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांना सतावत होती.’ तर दुसरीकडे सिद्धार्थ सांगतो, ‘त्याच्या वडिलांचे एक स्वप्न होते, जे त्याला पूर्ण करायचेच होते.’ यंदाच्या विश्वचषकासाठी 17 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर, पाच खेळाडूंचा स्टँडबाय म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. यश धूल संघाचा कर्णधार तर एस के रशीद संघाचा उपकर्णधार असेल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.