कोल्हापूरची मिरची सोनाली पाटील Big Boss मधून बाहेर, ‘हे’ २ स्पर्धक गेले फायनलमध्ये…

कोल्हापूरची मिरची सोनाली पाटील Big Boss मधून बाहेर, ‘हे’ २ स्पर्धक गेले फायनलमध्ये…

बिग बॉस मराठीचे तिसरे पार्व सुरु होणार किंवा नाही, याबद्दलच शंका होती. शोचे होस्ट म्हणजेच महेश मांजरेकर यांची ताबियेत, चांगलीच खालावली होती. कॅ’न्सरसारख्या आ’जाराला हरवून ते पुन्हा आपले स्वास्थ्य सुधारत असतानाच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाली होती. त्यामुळे हा शो होणार का, किंवा शोचे सूत्रसंचालन म्हणजेच होस्ट महेश मांजरेकरच असतील का याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

पण, यंदाच्या पर्वाची सुरुवात देखील चांगलीच धडाक्यात झाली. यंदाचे पर्व सुरुवातीपासूनच जोरदार चर्चेत राहिले. मग ते कीर्तनकार शिवलीला आणि तृप्ती देसाई यांचा वा’द असेल किंवा शिवलीलाची अचानक झालेली एक्झिट असेल, प्रत्येक मुद्द्याने चांगलीच चर्चा रंगवली होती. त्यातच काही सदस्यांनी मात्र, सुरुवातीपासूनच चाहत्यांची मन जिंकली.

त्याच मोजक्या सदस्यांपैकी एक कोल्हापूरची सोनाली पाटील देखील होती. आपली अस्सल कोल्हापुरी स्टाईलने तिने मोठा चाहतावर्ग कमवला. सुरुवातीपासूनच घरातील सदस्य जस की, मीरा, गायत्री, स्नेहा, सुरेख कुडची यांनी तिच्या अस्सल कोल्हापुरी वागण्या-बोलण्यावरून तिच्यावर टीकास्त्र चालवले. पण बिग बॉसच्या घरात चाहत्यांची मर्जी चालते.

आणि प्रेक्षकांना सोनाली अगदी खूपच आवडली. त्यामुळे माघील आठवड्यामध्ये, सोनालीने जय दुधाने सारख्या स्ट्रॉंग सदस्याला माघे टाकत सर्वाधिक मत जिंकली होती. मात्र, यावेळी पुन्हा एकदा सोनाली नॉमिनेट झाली होती. या शेवटच्या आठवड्यात सोनालीला, घराच्या बाहेर जावं लागणार आहे. नुकतंच समोर आलेल्या वृत्तानुसार, सोनाली पाटील या आठवड्यात बिग बोस मराठीच्या घराच्या बाहेर पडणार आहे.

या बातमीने तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सोनालीचे चाहते उघडपणे आपली नाराजगी व्यक्त करत आहेत. सोनाली, विकास, उत्कर्ष आणि मीरा हे चार जण या आठवड्यात घराच्या बाहेर जाण्याचा प्रक्रियेसाठी नॉमिनेट होते.

या चार सदस्यांपैकी, मीरा आणि उत्कर्षला माघील कित्येक आठवड्यापासून सोनालीने मत मिळवण्याच्या बाबतीत माघे टाकले आहे. त्यामुळे सोनाली घराच्या बाहेर पडणार हा, प्रेक्षकांसाठी मोठा धक्काच आहे. आता मीनल, विशाल, जय दुधाने, विकास पाटील, उत्कर्ष, आणि मीरा हे सदस्य बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्यात आपला खेळ दाखवणार आहेत.

या सर्वांपैकी विशाल निकम पहिला फायनलिस्ट ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ जय दुधाने दुसरा फायनलिस्ट ठरला आहे. बिग बॉसच्या घरात कोणत्याही क्षणी गोष्टी बदलू शकतात हेच पुन्हा एकदा, सोनालीच्या एव्हिक्शनमुळे समोर आले आहे. कोल्हापूरची मिरची म्हणून सोनालीच्या चाहत्यांनी तिला नवी ओळख दिली होती. आणि तिच्या घराबाहेर पडण्याने आता स्पर्धकांमध्ये जिंकण्याची अधिकच चुरस बघायला मिळणार हे नक्की. अनेक सेलेब्रिटीच्या मते, जय दुधाने आणि विशाल निकम हे दोन टॉप २ सदस्य असू शकतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.