“कुटुंबाला वेळ देता यावा” म्हणून टी-20मधून निवृत्त होणार विराट कोहली.!

ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताचे आव्हान आता संपुष्टात आलेले असल्यामुळे भारतीय संघ लवकरच मायदेशात परत तर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ल्डकप मध्ये सहभागी होण्याचा आधी भारताचा संघ अनेक दौरे करून आला होता. त्यामुळे तो खूप थकला होता. त्यामुळे भारतीय संघाला आरामाची गरज होती.
मात्र, असे असले तरी भारतीय संघ ट्वेंटी-ट्वेंटी चा वर्ल्डकप मध्ये सहभागी झाला. अनेक जण या आधीपासूनच भारतीय संघ चांगले खेळू शकणार नाही, असे सांगत होते. आणि त्याप्रमाणे झाले देखील. भारताला टी20 वर्ल्ड कप मध्ये न्युझीलँड तसेच आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यासोबत हार मानावी लागेल.
पाकिस्तानसोबत भारत अनेक वर्षानंतर वर्ल्डकप मध्ये हरल्याचे सांगण्यात येत आहे. तर भारताने याच वर्ल्डकप मध्ये अधिक कमकुवत असलेल्या स्कॉटलंड या संघावर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर अफगाणिस्तानला देखील चारीमुंड्या चीत केले. त्याचप्रमाणे नामिबिया या दुबळ्या संघाला देखील भारताने हरवल. मात्र या संघाला हरवून भारताला काहीही उपयोग झाला नाही.
नेट रन रेट मध्ये भारत कमी पडला आणि स्पर्धेच्या बाहेर पडला. विराट कोहली आता लवकरच ट्वेंटी-ट्वेंटी कर्णधार पदावरून निवृत्त होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून जोरात रंगत आहे. याबाबतच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. भारताचा कर्णधार विराट कोहली हा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप झाल्यानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचा दावा पाकिस्तानी माजी गोलंदाज मुस्ताक अहमद याने नुकताच केला आहे.
तसेच तो निवृत्त देखील होईल असेही त्यांनी सांगितले आहे. अहमद याने पाकिस्तानच्या जिओ टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की, विराट कोहली हा कुटुंब वत्सल आहे. कुटुंबासाठी तो आता वेळ देईल. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटी, क्रिकेटमधून निवृत्त होईल. आणि कसोटी क्रिकेट आणि वन-डेमध्ये तो मोठे मोठे विक्रम करेल, असा दावा देखील अहमद याने केला आहे.
मात्र विराट कोहली कधी निवृत्त होतो, याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. आता टी-20 संघाची माळ रोहित शर्मा च्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हक याने देखील वेगळाच दावा केला आहे.
भारतीय क्रिकेट बोर्ड हा दोन गटांमध्ये विभागलेला आहे. त्यामुळे भारताचे नुक’सान खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्याने म्हटले आहे. आता भारतात परतल्यानंतर विराट कोहली आपल्या निवृत्तीची घोषणा कधी जाहीर करतो, याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, अनेकांना असे वाटते की विराट याने निवृत्ती घेऊ नये.