किन्नर दिर्घआयुष्य कसे जगतात ? ”हे आहे त्यामागील रहस्य….

प्रत्येकालाच वाटते आपले आणि आपल्या अप्तेयिष्टांच्या आयुष्य जास्त असावे. त्यासाठी निरोगी राहणे महत्वाचे असते. म्हणून अनेकजण आपल्या स्वास्थाची खास काळजी देखील घेतात. वेगवेगळ्या संशोधनकर्त्यानी त्यावर अनेकवेळा संशोधन केले आहे. त्याबद्दल नेहमीच काही ना काही खास खुलासे होतच असतात.
आता कोणाचे आयुष्य किती असते याबद्दलच एक मोठं संशोधन केल्याचं समोर आलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, पुरुष आणि महिलांहून आयुष्य किन्नरचे असते असं या संशोधनातून समोर आले आहे. दक्षिण कोरियामध्ये काही काळापूर्वी एक संशोधन झाले होते. याच संशोधनावरून समोर आले आहे की तृतीयपंथी सामान्य माणसांपेक्षा जास्त काळ जगतात.
आतापर्यंत सगळीकडेच तृतीयपंथीयांच्या आयुष्याकडे साधारणपणे लोकांनी फारसे लक्ष दिलेले नाही. पण त्यांचे आयुष्य कसे असते हा मात्र नेहमीच कुतुहलाचा प्रश्न राहिला आहे. त्यांचे बंध ते कसे तयार करतात? त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो त्याचे रहस्य काय आहे? कोरियन द्वीपकल्पात शेकडो वर्षे वास्तव्य करणाऱ्या नपुंसकांच्या जीवनाशी संबंधित घरगुती कागदपत्रांचा संशोधकांनी अभ्यास केला.
कास्ट्रेशनमुळे तृतीयपंथी जास्त काळ जगत असल्याचे या संशोधनामध्ये समोर आले आहे. पुढे या संशोधनात असेसुद्ध सांगण्यात आले आहे की, इतर लोकांपेक्षा तृतीयपंथी जवळपा 20 वर्षे जास्त जगतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण, हे एक वैज्ञानिक सत्य आहे की पुरुषांचे हार्मोन्स त्यांचे वय कमी करण्यास कारणीभूत ठरतात.
तसे बघता किन्नरांची भूमिकाप्रत्येक संस्कृतीत आणि सभ्यतेमध्ये महत्त्वाची असते. ते काही खास गोष्टी करतात. उदाहरणार्थ, हरम किंवा जनानखाना सांभाळणे ही तृतीयपंथीयांची विशेष जबाबदारी होती. राजघराण्यातील महिलांचे वास्तव्य असलेली जागा म्हणजे हरम. संशोधकांच्या मते, जर बालपणाच्या सुरुवातीलाच मुलांचे अंडकोष कापले गेले तर त्यांच्या विकासात अडथळा येतो.
परिणामी ती मुले कधीही पूर्णतः पुरुष होऊ शकत नाहीत. या संशोधनाशी निगडित शास्त्रज्ञ डॉ. शिओल कू ली यांनी सांगितले, “कोरियामध्ये राहणाऱ्या किन्नरांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, त्यांच्यात महिलांसारखी काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की त्यांना मिशा नसणे, त्यांचे नितंब आणि छाती खूप मोठी असणे. त्यांचा आवाज गंभीर असतो.”
कोरियामध्येही किन्नर शाही दरबारात काम करत असत. आपल्या देशात देखील मुघलांच्या काळातही दरबारापासून ते राणीवस्यापर्यंत नपुं’सकांना नोकऱ्या दिल्या जात होत्या. इतिहासातील काही घटनांमध्ये त्यांची भूमिका खास होती. कोरियामध्ये, किन्नरांचा जन्म 1556 ते 1861 दरम्यान झाल्याचे सांगितले जाते.
त्यांचे सरासरी वय 70 वर्षे होते तर, त्यातील ३ किन्नर 100 वर्षांपेक्षा जास्त जगले. त्यानंतर देशभरात त्यांची संख्या सुमारे 5 लाख असल्याची माहिती समोर आली आहे. कोरियातील तृतीयपंथीयांच्या तुलनेत, खानदानी घराण्यातील पुरुषांचे सरासरी वय 50 पेक्षा किंचित जास्त होते. तर राजघराण्यातील पुरुषांचे सरासरी वय फक्त 45 वर्षे होते.
मात्र, त्यावेळच्या स्त्रियांबद्दल अशी कोणतीही माहिती नाही की त्यांची तुलना तृतीयपंथीयांशी करता येईल. स्त्रियांचे वय पुरुषांपेक्षा जास्त आहे असं सर्वच समाजात. मात्र, आजपर्यंत याचे कोणतेही स्पष्ट कारण कोणत्याही संशोधकाला सापडलेले नाही. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे असे होते, असं एक मत असे आहे.
परंतु त्यामुळेच असं होत, हे कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. ‘वृद्धापकाळ’वर संशोधन करणाऱ्या ब्रिटनमधल्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरियामध्ये करण्यात आलेले हे संशोधन खूपच रंजक आहे. किन्नरांच्या दीर्घायुष्याचे एक कारण त्यांची राहण्याची पद्धत देखील असू शकते, असं मत त्यांनी व्यक्त केले.