का? जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर छापला जातो गणपतीचा फोटो, जाणून घ्या त्यामागील रहस्य…

या वर्षी कोरोणाचे सावट असल्याने सरकारचे सर्व नियमांचे पालन करून गणरायांची स्थापना झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणपती बसवले गेले आहेत. कोरोणा च्या या महामारी मुळे या वर्षात सार्वजनिक गणपतीचे सोहळ्यावर देखील सावट आलेले आहे. सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करून सार्वजनिक गणपतीच्या मूर्ती घेण्यास धावपळ बघायला मिळाली. 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेश मूर्ती बसविल्या असून हा उत्सव 10 दिवस चालणार आहे.
महाराष्ट्र असो किंवा दिल्ली, गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकजण आनंदी दिसत होता. केवळ भारतच नाही, तर अनेक देशांमध्ये गणेशाची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्याची माहिती फार कमी लोकांना माहिती असेल. जगात मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे ज्या देशात नोटेवर गणेशजींचा फोटो छापलेला आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.
तथापि प्रतेक देशाचे चलन हे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात मोजले जाते. आपल्या देशात चलन रुपयांत मोजतात तर अजुन असे अनेक देश आहेत जिथे चलन डॉलर मध्ये मोजले जाते. तसेच प्रत्येक देशाचे चलनावर कसला ना कसला तरी फोटो छापलेला असतो. हीच त्या त्या देशाचे चलनाची ओळख असते. चलणावरील फोटो वरून लगेच समजते की हे चलन कोणत्या देशाचे असू शकते.
सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटेवर गणपतीचा फोटो छापलेला आहे. आज आपण ज्या देशाबद्दल बोलणार आहोत त्या देशाचे नाव आहेत इंडोनेशिया. इंडोनेशियाच्या चलनास रूपिया म्हणतात. या देशातील चलनावर 20 हजारांच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. वास्तविक, या मुस्लिम देशात भगवान गणेश हे शिक्षण, कला आणि विज्ञानाचे देव मानले जातात. विशेष म्हणजे इंडोनेशियातील सुमारे 87.5 टक्के लोक इस्लाम धर्मावर विश्वास ठेवतात आणि हिंदू लोकसंख्येपैकी केवळ तीन टक्के.
नोटेवर गणपतीच्या फोटोचे वैशिष्ट्य :
इंडोनेशियातील या 20 हजारांच्या नोटेवर समोरील भागात गणेशाचा फोटो छापलेला आहे तर याच नोटेच्या मागील भागात शाळेतील वर्गाचा फोटो आहे. ज्यात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे फोटो आहेत. आपल्या देशातील नोटेवर गांधीजी यांचा फोटो छापलेला आपल्याला दिसतो आहे. इंडोनेशियात नोटेवर गणेशजिंचा फोटो छापलेला असल्याने तेथील लोकांना हे सुखदायक वाटत आहे.
नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचे कारण :
वास्तविक, इंडोनेशियाची अर्थव्यवस्था काही वर्षांपूर्वी रुळावरून खाली घसरली आहे. यानंतर 20 हजारांची नवीन नोट जारी करण्यात आली ज्यावर भगवान गणेशाचा फोटो छापलेला दिसत आहे गेले. हे छापण्यामागील आर्थिक विचारवंतांचा असा विश्वास होता की गणेशजी यांच्या कृपेने अर्थव्यवस्था पुन्हा बळकट होईल आणि नंतर असेच काहीसे झाल्याचे पाहिले गेले.