कहरच ! शेण खाल्ल्यानं तन-मन पवित्र होतं’ सांगत डॉक्टरने चालू कॅमेऱ्यासमोर खाल्लं शेण..पहा Video..

कहरच ! शेण खाल्ल्यानं तन-मन पवित्र होतं’ सांगत डॉक्टरने चालू कॅमेऱ्यासमोर खाल्लं शेण..पहा Video..

आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला आईच्या दर्जा दिला जातो. ३३ कोटी देवांचे वास्तव्य गाईमध्ये असते असे आपल्या पुराणांत सांगितले आहे. गाई मनुष्याला दूध देते, त्यापासून दही, तूप, लोणी असे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. सोबतच, गोमूत्र मध्ये अनेक आ’जारांना कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे सर्वाथाने गाईला मातेचा दर्जा दिला जातो, त्यामध्ये काही चूक नाहीये.

आजवर अनेकांनी गाईच्या संदर्भात, वेगवेगळे दावे केले आहेत. त्यापैकी काही वास्तव आहेत, तर काही केवळ थोतांड आहेत. एका न्यूज रिपोर्टरने माघे बातमी दिली होती की, गाय ऑ’क्सिजन श’रीरात घेते आणि ऑक्सिजनच बाहेर सोडते. जेव्हा की वैज्ञानीक दृष्ट्याच काय तर, कोणत्याही दृष्ट्या हे पूर्ण चुकीचे आहे.

काही दिवसांपूर्वी एका सांसदने दावा केला होता की केवळ गाईच्या पाठीवरून हात फिरवल्यामुळे त्यांचा कॅ’न्सर बरा झाला. आणि त्याच संबधित सांसद एम्सच्या रु’ग्णालयात स्वतःवर उ’पचार करून घेताना आढळले. त्यामुळे, त्यांनी केलेले वक्तव्य खोटे आणि केवळ संभ्रम होता हे सिद्ध झाले. त्याचबरोबर, एका राजकीय पक्षाच्या स्पोक्सपर्सनने गाईच्या शेणामधून हिरेबनवता येत असल्याचा बोलून गेले होते.

अशा खो’ट्या आणि पातळीहीन व’क्तव्यामुळे आपण गाईचे खरे महत्व न समजता, त्याउलट खोटं सिद्ध करत आहोत हेदेखील या लोकांना समजत नाही. को’रोना म’हम’रीसोबत संपूर्ण जगाने मोठा लढा दिला. त्यावर, लसीचे संशोधन सुरु होते. आणि त्याच काळात गुजरातच्या एका नेत्याने गाईच्या शेणात राहिल्याचे को’विड होत नाही असं म्हणत, शेणाने अंघोळ करत एक व्हिडियो बनवून इंटरनेटवर टाकला होता.

आता असंच काही कृत्य चक्क एका एमबीबीएस डॉक्टरने केले आहे. हरियाणाच्या कर्नाल येथील रहिवासी डॉ मनोज मित्तल यांचा एक व्हिडियो सगळीकडेच तुफान वायरल होत आहे. यामध्ये डॉ मनोज मित्तल शेण खाण्याचे फायदे सांगत चक्क गाईचे शेण खात गोमूत्र पित आहेत. गाईच्या शेणामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे श’रीराचे ‘घातक रेडिएशन पासून संरक्षण होऊ शकते.

इलेकट्रोनिक उपकरणांमध्ये जसे की, मोबाईल,फ्रिज इ उपकरणामधून घातक रेडिएशन येतात. त्यामुळे मनुष्याच्या श;रीराची हा;नी होते. शेण खाल्ल्याने या रेडिएशन पासून मनुष्याचा श’रीराचा बचाव होतो. त्यानंतर त्यांनी केलेला दावा अत्यंत ध’क्कदा’यक आणि वि’चित्र आहे. ग’र्भव’ती म’हिलेनं शे’ण खाल्लं तर प्र’सूतीदरम्यान तिला कमी वे’दना होतात.

त्यामुळे, ग’र्भव’ती महिलेनं गाईचे शेण खाल्लं पाहिजे. या सर्वांमध्ये मोठी बाब अशी की, हे डॉ’क्टर बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचं मोठं रुग्णालय आहे. एमबीबीएस एमडी पदवी त्यांच्याकडे आहे. आणि असं असताना देखील ते शेण खाण्याचा मा’थेफि’रू सल्ला देत आहेत.

त्यांच्या व्हिडियोकडे केवळ विनोदाचा भाग म्हणून बघितले जात आहे. तर काहींनी त्या व्हिडियोवर संतप्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. ‘आस्था आणि भक्ती हे मनुष्याच्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. मात्र जिथे आस्था अंधश्रद्धा बनते, तेव्हा काय होते हे या डॉक्टरांनी दाखवले आहे,’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडियोवर येत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *