‘कलिंगड’ कापल्याशिवाय ते गोड आहे की नाही हे ‘कसे’ ओळखाल? जाणून घ्या ‘या’ 5 टिप्स…

उन्हाळा सुरू झाला की आपण थंड पदार्थ जास्त खात असतो. त्यात आपल्याला उन्हाळ्यात एखाद्या वरदानपेक्षा कमी नाही ते कलिंगड. उन्हाळ्यात कलिंगड खाणे सर्वांनाच आवडत असते. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आपल्याला शरिराला होत असतात.
उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि आपल्याला उष्माघाताचा धोका कमी होतो. हे कारण अनेकांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही ते देखील आवडीने कलिंगड खातात.
पण अनेक वेळा जेव्हा आपण कलिंगड खरीदी करतो तेव्हा ते बाहेरून दिसायला तर छान असते आणि आपल्याला ही असे वाटते की हे आतून लाल आणि गोड निघणार पण असे होत नाही. यामध्ये कित्येकदा आपली फसवूनक होत असते.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलिंगड खरीदी करताना तुम्ही कोणती दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून तुमचे कलिंगड आतून लालमलाल आणि गोड निघेल किंवा तुमची फसवणूक होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया.
कलिंगड न कापता गोड आहे की नाही हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत त्या खालीलप्रमाणे.
१.कलींगडावरील डाग
काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे डाग म्हणजे ज्यावेळी कलिंगड काढून ठेवले जातात ते या डागांच्या ठिकाणी खाली ठेवले जातात.पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये. शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड घ्यावा.खूप गोड असतो.
२.कलिंगडावरील जाळी
ही जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रिये वेळी माशांनी जास्तीत जास्त वेळा फुलांना स्पर्श केला आहे. जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.
३.मुलगा की मुलगी
तुम्हांला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ही काय भानगड आहे. पण यावरही कलिंगड किती गोड आहे की त्यात पाण्याचा अंश जास्त आहे हे समजते. उंच कलिंगड म्हणजे “मुलगा” असे समजावे. यात पाण्याचा अंश जास्त असतो. गोल कलिंगड म्हणजे “मुलगी” असे समजावे. हे खूप गोड असत.
४.आकार
कलिंगडाचा आकार जास्त मोठा नको किंवा जास्त छोटा ही नको. मधल्या आकाराचा कलिंगड गोड लागतो. त्यामुळे कलिंगड घेताना मध्यम आकाराचा घ्या.
५.देठ
देठ जर हिरवा असेल तर कलिंगड लवकर काढले आहे म्हणजे ते पिकण्या अगोदर काढले आहे. हे जास्त गोड नसत, देठ जर सुकलेला असेल तर गोड कलिंगड, आणि पूर्ण पिकलेले आहे. म्हणून कलिंगड खरीदी करताना या गोष्टी लक्षात असू द्या आणि या उन्हाळ्यात त्याचा आस्वाद घ्या.