कर्जापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ वास्तू टिप्स चा वापर .. पैशाचा पडेल पाऊस..

कर्जापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘या’ वास्तू टिप्स चा वापर .. पैशाचा पडेल पाऊस..

पैसा ही आपल्या जीवनातील अविभाज्य गोष्ट आहे. सगळ्या गोष्टींची सोंग आणता येतात पण पैशाचं नाही, हे वाक्य चांगलेच प्रसिद्ध आहे. पैसा मिळवण्यासाठी, कमवण्यासाठी माणूस पडेल ते काम करत असतो. आताच्या घडीला पैसा हेच स’र्वस्व झाल्यासारखे भासते. ज्याला पाहावं, तो पैशांच्या मागे धावताना दिसतो.

खरे तर, कोणालाही कर्ज घ्यायचे नाही परंतु काही वेळा परिस्थितीत कर्ज घ्यावे लागते. तर आपल्याकडेही पुन्हा पुन्हा कर्जाच्या परिस्थिती उद्भवत असल्यास. किंवा जर आपण कर्ज परतफेड करण्यास अक्षम असाल तर यासाठी काही वास्तूशास्त्र उपाय आहेत ज्याद्वारे आपण कर्जातून मुक्त होऊ शकता. यामुळे आपण श्रीमंत देखील होवू शकता. चला, तर जाणून घेऊया.

तुलसी पूजा:- तुळशीच्या झाडाने घराचे वास्तू दोष दूर केले जावू शकतात. घराच्या मुख्य गेटच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात तुळशीची लागवड करावी. त्यास रोज सकाळी आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैसे येतात.

पाणी साठवण्या भांड्याची दिशा बदला:- जर आपण कर्जातून मुक्त होऊ शकत नसाल किंवा आपल्याकडे पुरेसे पैसे येत नसतील. तर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात पाण्याच्या जागेची दिशा बदलली पाहिजे. पाण्याचे भांडे उत्तर दिशेने ठेवा. ही दिशा पाण्यासाठी उत्तम मानली जाते.

लाफिंग बुद्धा आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करेल:- लाफिंग बुद्धा ची एक छोटी मूर्ती आपल्या आयुष्यात चालू असलेल्या आर्थिक स’मस्या दूर करू शकते. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी लाफिंग बुद्धा ठेवावा. ही मूर्ती आपली आर्थिक स्थिती मजबूत करेल.

मंगळवारच्या दिवशी कर्ज फेडा:- जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतले असेल आणि आपण ते परत करण्यास सक्षम नसाल तर. किंवा आपण एकाच वेळी सर्व पैसे परत करण्यास सक्षम नाही. तर या प्रकरणात आपण मंगळवार च्या दिसवशी थोडी थोडी रक्कम परतफेड करावी. असे केल्याने आपण लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हाल. तसेच देवी लक्ष्मीसुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईल.

घरातील जिना चुकीच्या दिशेने असल्यास कर्ज वाढते:- आपल्या घरात पायर्‍या जरी चुकीच्या दिशेने केल्या गेल्या तरी आपल्याला कर्ज घ्यावे लागेल. कारण वास्तूशास्त्र म्हणते की घरामध्ये पायऱ्या पश्चिम दिशेने कधीही बांधू नये. असे झाले तरी एखाद्याला मोठे कर्ज घ्यावे लागते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा आपण एखादी इमारत तयार कराल तेव्हा पायऱ्यांच्या दिशेची विशेष काळजी घ्या.

वास्तु शास्त्रानुसार, पलंगावर बसून कधीही जेवू नये. असं केल्याने घरात अशांतता होते आणि घरातील सदस्य कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता असते. रात्री झोपण्याच्या पूर्वी घराच्या स्वयंपाकघरात पाण्याची एक बादली भरून ठेवा. या मुळे कर्ज पासून मुक्ती मिळते.

तसेच स्नानगृहात पाणी भरून ठेवल्यानं देखील जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतात. कलश किंवा लहान तांब्याला घरातील देवघरात ईशान्य कोणात पाण्याने भरून ठेवा. असे केल्याने घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *