ओम पैठणे ; कॅब ड्रॉयव्हर ते आर्मी ऑफिसर होण्याचा प्रवास….

आपल्यापैकी खूप जनांची महत्वकांक्षा आणि स्वप्न खूप वेगळे असतात. पण,परिस्थितीमुळे त्यांना हार मानून आयुष्यासोबत तडजोड करत आपले स्वप्न विसरावे लागते. मात्र, आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत देखील जर तुम्ही आपले स्वप्न पूर्ण करू शकलात तेव्हा कित्येकांसाठी एक उदाहरण प्रस्थापित करता. तसेच काही घ’डले अगदी गरीब घरातून येणाऱ्या, ‘ओम पैठणे’ ह्यांच्या बाबतीत…
ओला कॅब चालवणारा हा पठ्ठ्या चक्क आर्मी ऑफिसर बनला…
बीड जिल्ह्यातील, लिंबारुई या छोट्याश्या गावातून येणारा ओम पैठणे ह्याने सर्वांना दाखवले की, संधीचे सोने करणे म्हणजे नक्की काय असते. फक्त त्यासाठी तुमच्याकडे महत्वकांक्षा आणि जिद्द असायला हवी. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी कष्ट व परिश्रम घेण्याची तुमची तैयारी असायला हवी.
बीएससी च्या शेवटच्या वर्षात असताना, ओम च्या वडिलांचा अ’पघा’त झाला आणि त्यामध्ये त्यांनी आपले दोन्ही पा’य ग’माव’ले. आपल्या कुटुंबाची परिस्थती बघता, त्याला आपले शिक्षण सोडून ओला कॅब्स मध्ये ड्रॉयव्हर चे काम करावे लागले. मात्र, एक दिवस रिटायर्ड कर्नल बक्षी ह्यांनी त्याची कॅब बुक केली.
कर्नल बक्षींना बघून, ओम च्या चेहऱ्यावर एक प्रसन्न असे हास्य आले आणि त्याने अगदी उत्साहाने त्यांच्याशी चर्चा सुरु केली. याच, प्रसंगानंतर ओम च्या आयुष्याला एक उत्तम वळण मिळाले.
देशातील सर्वात अनुभवी कर्नल, यांनी देखील ओम पैठणेची जिज्ञासा जाणून संरक्षण सेवा परीक्षांबद्दल आणि त्यामध्ये असणाऱ्या संधींबद्दल त्यांनी त्याला व्यवस्थित समजावून सांगितले. त्यानंतर ओम ने आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढे जाण्याचे ठरवले.
त्यानंतर त्यांनी त्यांना तत्कालीन संचालक, सशस्त्र बल अधिकारी निवड निवड कार्यक्रम, लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू यांच्याकडे पाठविले. ह्यानंतर ओम पैठणे ह्यांनी सहा महिने कॅब चालवली व CDS परीक्षा देण्याचे त्याने ठरवले. २०१६ मध्ये ओम पैठणे ह्यांनी परीक्षा दिली आणि पहिल्याच वेळेत, त्यांची निवड देखील झाली.
सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची (SSB ) ह्या परीक्षेमध्ये देखील ओम उत्तीर्ण झाला आणि OTA मध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी गेला. एक ओला कॅब ड्रायव्हर ते आर्मी ऑफिसर बनण्याचा ओम पैठणेचा हा प्रवास खरोखर खूपच प्रेरणादायक असा आहे.
“कर्नल बक्षी ह्यांच्यासोबत झालेल्या त्या संभाषनाणे माझे पूर्ण आयुष्य बदलले. त्या काही वेळात, मला माझ्यामधील निर्भीड आणि जिद्दी अश्या व्यक्तित्वाची पुन्हा ओळख झाली आणि आर्मी ऑफिसर बनण्याचे ठरवले. ट्रेनिंग मध्ये जी शिस्त शिकवली त्यावर मला खूप गर्व आहे,” असे ओम पैठणे सांगतात.
ओम पैठणेचा हा प्रवास, कित्येक मुलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. जिद्द आणि महत्वकांक्षा असेल तर, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.