ओठ फुटण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात ? फक्त थंडीमुळे नाही ‘या’ 5 कारणांमुळे जाणवते ‘ही’ समस्या, जाणून घ्या

ओठ फुटण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात ? फक्त थंडीमुळे नाही ‘या’ 5 कारणांमुळे जाणवते ‘ही’ समस्या, जाणून घ्या

पावसाळा ऋतू संपल्यातच जमा असून आता इथून पुढे थोड्याच दिवसात हिवाळा ऋतू सुरू होणार आहे. शक्यतो हिवाळा ऋतू सुरू झाला की आपली ओलसर त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. त्वचा कोरडी झाले नंतर ओठांवरती त्याचा जास्त परिणाम होताने दिसून येतो. आणि त्यानंतर ओठ फुटून ओठांची समस्या उधभवण्यास सुरुवात होते.

कारण की हिवाळ्यात हवामनात मोठा बदल घडून येत असतो आणि हवा कोरडी होते. परिणामी आपल्या त्वचेचा ओलसर पणा कमी होऊन त्वचा कोरडी पडू लागते. ओठ फुटू लागल्यानंतर आपण बरेचसे उपचार सुरू करतो. जसे की थंडीमध्ये लिप बाम, मॉइश्चरायझर, बॉडी लोशन इत्यादींचा वापर करण्यास आपण सुरुवात करतो. या सर्व कारणांमुळे ओठांना तडे जाऊ लागतात. ओठ क्रॅक होण्याची ही आहेत मुख्य कारणे.

1. ओठांवरून जीभ फिरवणे :- आपले कोरडे पडलेले ओठ ओलसर करण्याकरिता बरेच जण ओठांवरून जीभ फिरवतात. काही लोकांना ओठांवर वारंवार जीभ लावायची सवय लागलेली असते. जेणेकरून ओठांवरील कोरडेपणा दूर होऊन ओलावा येईल.

पण असे केल्याने फायदा कमी आणि तो-टाच जास्त होतो. ओठांवर जीभ फिरवल्यानंत आपली तोंडातील लाळ ओठावर पसरली जाते. असे केल्याने ओठ ओले होण्यापेक्षा कोरडेच होतात. आणि त्यामुळे ओठांना अधिकच क्रॅक जाऊ लागतात.

खर तर आपल्या लाळ (थुंकी) मध्ये काही विशिष्ट ए-न्झाइम्स असतात, जे आपण खाल्लेले अन्न पचविण्यासाठी खूप मोठी मदत करतात. परंतु जर आपण ओठांवरून जीभ फिरवत असणार तेव्हा आपल्या ओठांवर जिभेच्या द्वारे लाळ लागली जाते आणि एंजाइमच्या तीव्र प्रभावामुळे त्याचा वरचा थर कोरडा होऊ लागतो. याचा परिणाम असा होतो की ओठांवर लाळेचा परिणाम होऊन ओठ फुटू लागतात.

2. डि-हायड्रेशन :- डि-हायड्रेशन मुळे देखील ओठ फुटतात. डि-हायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरात पाण्याची कमी असते. आपल्या शरीरात पाणी असणे खूप महत्वाचे असते. आणि ते आपल्या जीवनाचा महत्वाचा आधार आहे. परंतु काहींना पाणी कमी पिण्याची सवय असते. काही लोक तहान लागेल तेव्हाच पाणी पितात.

तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावे असे काही नाही. आपल्या श-रीरातील पाण्याचे संतुलन कायम राखण्यासाठी दिवसभर पाणी पिणे महत्वाचे असते. नियमानुसार प्रत्येकाने एका दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

कमी पाणी पिण्यामुळे डि-हायड्रेशन व्यतिरिक्त अनेक आरोग्याच्या स-मस्या देखील उ-द्भवू शकतात. म्हणून आपल्या श-रीरात पाणी कमी असेल तर आपली त्वचा कोरडी होऊन त्याचा परिणाम ओठांवर होतो.

3. आंबट पदार्थ खानेमुळे :- आंबट पदार्थ खायला बऱ्याच लोकांना आवडते. परंतु पदार्थांमध्ये सा-इट्रिक ऍ-सिड असते. आंबट फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तों-डाला कोरडेपणा येति आणि ओठ फुटणे देखील सुरू होऊ शकते. तथापि, लिंबूवर्गीय फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते.

जरी व्हिटॅमिन सी खाल्याने आपल्या त्वचेचा ग्लो वाढत असेल किंवा असे पदार्थ खाल्याने वृद्धत्व लवकर येत नसले तरी या फळांच्या आम्ल स्वभावामुळे ते त्वचेला डि-हायड्रेट करू देखील करू शकतात. तसे तर फळ खाणे श-रीरासाठी फायदेशीरच असते. परंतु लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यास अधिक फायदेशीर ठरते. परंतु असे फळ खाल्यानंतर भरपूर पाणी पिणे देखील गरजेचे आहे.

4. अतिप्रमाणात केलेले म-द्य-पान :- बऱ्याच लोकांना विशेषतः बऱ्याचश्या पुरुषांना प्रमानापेक्षा जास्त म-द्य-पान करण्याची सवय असते. असे केल्याने अशा लोकांचे ओठांना तडा जाण्याची दाट श्यक्यता असते. याचे मुख्य कारण असे आहे की यात अ-ल्को-होल जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे शरीरात कोरडेपणा जास्त वाढू शकतो. आणि अ-ल्को-होल शरीराला डिहायड्रेशन करतो.

ज्यामुळे अशा लोकांचे त्वचेत अधिक प्रमाणात कोरडेपणा येतो. आपले ओठ खूपच मुलायम आणि संवेदनशील असतात आणि बोलताना ओठांचा संपर्क नेहमीच शरीरातील गरम हवेसोबत येत असतो. ते सतत शरीरात गरम हवेच्या संपर्कात येत असल्याने ओठांचा ओलावा नाहीसा होऊन ओठ कोरडे पडू लागतात. यावेळी ओठ फुटण्याचे प्रमाण अधिक स्वरूपात वाढू लागते.

5. चेलायटिस :- ओठांना क्रॅक जाण्याचे दुसरे पण कारण असते. ओठ फुटण्याला जबाबदार त्वचेशी संबंधित एक वेगळी समस्या देखील असू शकते. त्यालाच आपण चेलायटिस असे देखील म्हणू शकतो. या प्रकारात तोंडात आणि ओठांवर भेगा पडायला सुरुवात होते. आणि त्वचेला भेगा पडल्याने त्यातून रक्त देखील बाहेर येऊ लागते. ओठ तडकल्याने खूपदा रक्त बाहेर पडू लागते.

कधी कधी बऱ्याच लोकांचे ओठांवर सफेद कलरचा थर देखील साचलेला दिसून येतो. वारंवार फोड येणे आणि कोरडे पडणे हे याचे प्रमुख लक्षण आहे. याकडे जर दुर्लक्ष केले तर खूपदा संसर्गाचा फैलाव होण्याचा प्रकार घडत असतो. यावेळी अश्या प्रकरणामध्ये जर तुमचे ओठ घरगुती केलेल्या कोणत्याही उपचारांनी बरे होत नसतील तर यावेळी त्वचारोग तज्ञाशी संपर्क साधने आवश्यक असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *