ऑस्ट्रेलियासोबत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधारने ड्रेसिंग रुमध्ये दिली खेळाडूंना ताकीद, त्यात हसन अलीने…

पाकिस्तान क्रिकेट संघ सुरुवातीपासूनच वा’दाच्या भो’वऱ्यात अ’डकलेला आपण पाहिला आहे. केवळ आताच नाही तर, सुरुवातीपासूनच पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडू कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेकवेळा ती कारण योग्य असतातच असे नाही. मात्र, यंदाच्या टी-२० च्या सामन्यांमध्ये, पाकिस्तानच्या संघाकडून उत्तम प्रदर्शन बघायला मिळाले.
यंदाच्या संघाने सर्वात मोठी कामगिरी करुन दाखवली, अशी कामगिरी १९९२ पासून पाकिस्तानच्या कोणत्याच क्रिकेट संघाला जमली नव्हती. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने, भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवत, पहिल्यांदाच विश्वचषक सामन्यांमध्ये भारताविरुद्ध आपली पराभवाची साखळी मोडीत काढली.
त्याचबरोबर, इतर सामन्यांमध्ये देखील पाकिस्तानच्या संघाने चांगले प्रदर्शन केले. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. पाकिस्तान सोबतच भारतीय क्रिकेट प्रेमींच्या देखील या सामन्याकडे नजरा होत्या. सोशल मीडियावर त्याबद्दलच्या ट्विट्स आणि मिम्सचा वर्षाव होत आहे.
मात्र, आपल्या संघाला पराभव पत्करावा लागला असला तरीही, संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या संघाला उत्तम प्रकारे सांभाळले आहे. ड्रेसिंग रूममध्ये, बाबरने आपल्या सह-खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. बाबर आझमने आपल्या खेळाडूंना, ‘बॉईज प्लेड वेल,’ म्हणत हि तर केवळ सुरुवात आहे असे बोलले.
बाबर आझम ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सह-खेळाडूंना म्हणाला की,’हे दु:ख आपल्या सर्वांचे आहे. आपण काय चूक केली, कुठे चुकलो, कोणीही एकमेकांना सांगणार नाही, कारण सर्वांनाच माहीत आहे कोण कुठे चुकलं. त्यामुळे कोणीही कोणाला सांगणार नाही, की आपण त्याच्या चुकीमुळे हरलो. एक संघ म्हणून आपण या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
आणि त्यामुळेच संघ म्हणून आपण आपली एकता कायम ठेवायची आहे. खेळलो तर सर्वच चांगले, नाही तर संपूर्ण संघच खराब खेळला. म्हणूनच कोणीही कोणाकडे बोट दाखवणार नाही.’ पुढे तो म्हणाला, ‘हो, आपला प’राभव झाला आहे. हरकत नाही. या प’राभवातून धडा घेऊ आणि आगामी मालिका व स्पर्धांमध्ये येथे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊ.
प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण जी जोडणी केली आहे, ती तुटली नाही पाहिजे. एका पराभवाने आपला संघ तुटू नये. आपण सर्वांनी आपली भूमिका चांगल्या प्रकारे बजावली आहे, एक कुटुंबासारखे वातावरण तयार केले आहे. एका पराभवामुळे ते धो’क्यात येऊ नये. निकाल आपल्या हातात नसतो, पण सातत्यपूर्ण कामगिरी केली.
तर आपोआप चांगला आणि चांगलाच निकाल येऊ लागतील. ‘ हसन अलीने, ऑस्ट्रेलियाच्या वि’रोधात सामन्याच्या १९व्या षटकात मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता. त्यानंतर वेडने सलग ३ षटकार ठोकले आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. म्हणून हसन अलीला, सोशल मीडियावर पराभवासाठी कारणीभूत ठरवण्यात येत आहे.
‘पराभवाचा दो’ष कोणीही एका खेळाडूवर टाकणार नाही. आणि जर कोणी असे करताना मला दिसले किंवा माझ्या कानावर आले तर चांगले होणार नाही. मी त्याच्या वि’रोधात कसा जाईन हे सांगायची गरज नाही.’ असं म्हणत बाबर आझमने आपल्या खेळाडू हसन अलीचा बचाव केला.
Babar Azam, Saqlain Mushtaq and Matthew Hayden are proud of their side despite a five-wicket defeat in #T20WorldCup semi-final. pic.twitter.com/kAem5PrWjj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 11, 2021