ऑनलाइन लूडो गेम खेळताना मुलगी पडली मुलाच्या प्रेमात, ओडीसाहुन पोचली थेट पानिपतला

पूर्वीच्या काळामध्ये एखादी मुलगी एखाद्या मुलाला जर आवडली असेल तर त्या काळात संवाद साधण्यासाठी आजच्यासारखे मोबाईल नव्हते. त्या काळामध्ये पत्र लिहिले जायचे आणि त्या पत्राला गोंडस “प्रेम पत्र” असे नाव देण्यात येत होते.

आता सध्याचा जमाना हा अतिशय वेगवान झालेला आहे. त्यामुळे संवादाचे साधन देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता मोबाईल ने क्रांती केल्याने सोशल मीडिया देखील खूप मोठ्या प्रमाणात बोकळला आहे.

या माध्यमातून काही चांगल्या घटना घडतात, तर काही वाईट घटना घडतात. मात्र, तुलनेमध्ये वाईट घटना जास्त घडताना दिसत आहेत. ऑनलाइन ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडून अनेक प्रेमी युगल पळून गेल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या असतील.

काही महिन्यांपूर्वी एक अशीच घटना घडली होती. सोलापूरच्या एका तरुणीची जळगावच्या एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर ही तरुणी त्याच्या प्रेमात पडली आणि त्याला भेटण्यासाठी थेट जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यात पोहोचली.

त्यानंतर गावामध्ये एकच चर्चा सुरू झाली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांना संपर्क साधून दिला. पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर ती मुलगी आपल्या वडिलांच्या घरी गेली.

आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत की, ऑनलाइन गेम खेळताना देखील एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली त्यानंतर समोर झालेला प्रकार हा अतिशय धक्कादायक होता.

गेल्या काही वर्षापासून ऑनलाइन गेम खेळून लाखो रुपये आपल्या पालकांच्या खात्यामधून उडवण्याचे अनेक उदाहरण समोर आलेले आहेत. त्यानंतर हे पालक अतिशय हतबल झाले आहेत. त्यामुळे आपली मुले काय करतात याकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

आज आपल्याला एक अशीच घटना सांगणार आहोत. ही घटना पानिपत मधील आहे. हरियाणाच्या पानिपत येथे राहणारा एक मुलगा आणि ओडिशामध्ये राहणारी एक मुलगी ऑनलाइन लूडो गेम खेळत होते. या वेळी त्यांची ओळख झाली त्यांची ही ओळख साधारणत दोन वर्षांपूर्वी झाली होती.

त्यानंतर गेम खेळता खेळता या दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईल नंबर घेतल्यानंतर या दोघांमधील संवाद वाढायला लागला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे ही मुलगी मुलाला भेटण्यासाठी थेट पानिपतला गेली.

पानिपतला गेल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचे ठरवले. त्यानुसार मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला याबाबत माहिती दिली. याबाबत मुलीच्या आईला देखील माहिती होती. मात्र, तिचा या लग्नाला विरोध होता.

तरी देखील या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले आणि लग्न ज्या वेळेस सुरू होणार त्याच वेळेस बाल विरोधी विभागाच्या रजनी गुप्ता यांना याबाबत माहिती मिळाली. पथक दाखल झाले आणि त्या मुलाला त्याच्या वयाचे दाखले विचारले तर त्याला वयाचा दाखला देता आला नाही.

तो सज्ञान नव्हता. 2 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर या दोघांनाही समज देण्यात आली. या मुलीचे कुटुंब मूळचे बिहारचे आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाल्याने ती ओडिसा येथे राहायला आलेली आहे.

ती सध्या नववीत आहे, तर आपल्या आजूबाजूला देखील अशा घटना घडत असतील तर वेळीच पोलिस तसेच बाल विवाह विभागाला माहिती द्या.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *