एकेकाळी वेटरचे काम करणारा हिंदुस्थानी भाऊ आज कमवतोय करोडो रुपये..पहा कुटुंबासोबत काही सुंदर फोटो…

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जिथे अनेकजण रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी अनेकजण त्यांनी शेअर केलेल्या व्हिडियोजमुळे चर्चेत येतात. आज तर जवळपास सर्वच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत असतात.
फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब आणि ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्म वर तुम्ही सहजपणे तुमचे मत मांडू शकतात. तुम्ही मांडलेले मत समोरच्याला आवडेलच असं नाही. अनेकवेळा त्यांना ट्रोल देखील केलं जात. ट्रोलिंग सुरु झालं की, अनेकजण पुन्हा आपलं मत मांडत नाही.
मात्र असं असलं तरीही काही जण, त्या ट्रोलर्सला दाद न देता आपले मत मांडणारे व्हिडियोज अपलोड करतच राहतात आणि त्यातूनच त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळते. अगदी असंच काही एका सर्वसाधारण असणाऱ्या व्यक्तीसोबत झालं आहे. मात्र हा व्यक्ती आता इतका जास्त लोकप्रिय झाला आहे की, पाकिस्तानच्या सोशल मीडियामध्ये देखील त्याच्या नावाचा दबदबा बघितला जातो.
बिग बॉस सारख्या रियालिटी शो मध्ये केवळ आपल्या लोकरीप्रियतेच्या बळावर त्याला झळकण्याची संधी मिळाली. हा व्यक्ती अजून कोणी नसून हिंदुस्थानी भाऊ आहे. हिंदुस्थानी भाऊंचे खरं नाव विकास फाटक असं आहे. खारचा रहिवासी असलेला विकास फाटक कारमध्ये बसून शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर लोकप्रिय झाला.
लोकांना त्याची शैली खूप वेगळी आणि मजेदार वाटत होती. आपल्या स्टाईलमुळे त्याने अनेकवेळा वादांनाही आमंत्रण दिले आहे. फाटक हे यापूर्वी ठाण्यातील एका स्थानिक वृत्तपत्रासाठी क्राइम रिपोर्टिंग करत होते. हिंदुस्थानी भाऊचे यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर सोळा लाख फॉलोअर्स आहेत.
विशेष म्हणजे यूट्यूबवर अपमानास्पद मजकूर पोस्ट केल्याबद्दल त्याचे अकाऊंट बंद करण्यात आले आहे. तर गेल्या वर्षी, त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट देखील असभ्य भाषा वापरणे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठी बंद करण्यात आले होते.
आज जरी हिंदुस्थानी भाऊ हे नाव तरुणाईमध्ये चांगलंच प्रसिद्ध असलं तरीही एके काळी विकास फाटक यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. आज हिंदुस्थानी भाऊ करोडो रुपये कमवतात. असं सांगितलं जात की, बिग बॉस मध्ये त्यांना प्रत्येक भागासाठी लाखो रुपये घेत होता.
आता सेलिब्रिटींचे आयुष्य जगणारा विकासने सातवीत असताना एका हॉटेलमध्ये वेटरचे काम केलं. इतकंच काय तर, त्यांना घरोघरी जाऊन अगरबत्ती विकण्याचे काम देखील करावं लागलं आहे. मात्र कालांतराने परिस्थती बदलली आणि त्यांनी क्राईम रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०११ मध्ये त्यांना मुंबईतील सर्वोत्तम क्राईम रिपोर्टरचा पुरस्कार मिळाला आहे.
या हिंदुस्थानी भाऊंच्या कटुंबाबद्दल फार काही चाहत्यांना ठाऊक नाहीये. विकास फाटक यांनी स्वतः आपल्या पत्नीसोबतचे काही फोटोज शेअर केले आहेत. त्यांची पत्नी देखील सुंदर आहे. विकास फाटक यांना एक मुलगा देखील आहे. देशद्रोहींसाठी बनवलेला ‘पहिली फुरसत मी निकल’ हा व्हिडियो सर्वात जास्त लोकप्रिय ठरला. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.