एका मुलाची आई असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने ‘सलमान’ला घातली लग्नाची मागणी..

एका मुलाची आई असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने ‘सलमान’ला घातली लग्नाची मागणी..

नुकतंच सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच म्हणजेच कॅटरिना कैफच लग्न झालं. सगळीकडेच कॅटरिना कैफ आणि विकी कौशल्याच्या लग्नाच्याच बातम्या सुरु होत्या. ९ डिसेंबर रोजी कॅटरिना आणि विकीचा शाही विवाह सोहळा पार पाडला. मात्र, त्यानंतर देखील सगळीकडेच त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

त्यांच्या लग्नातील हळदीचे आणि मेहंदीचे फोटो समोर आले आहेत. आणि हे फोटो समोर येताच सगळीकडेच वायरल झाले. मात्र या सर्वात त्यांच्याहून जास्त एका नावाची चर्चा सुरु होती. साहजिकच सलमान खानच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु होती. सलमान खान, कॅटरिनाच्या लग्नाला जाणार का? सलमान खानच्या कुटुंबाला तिने आमंत्रण दिले आहे का?

सलमानच्या बहिणीसोबत म्हणजेच अर्पितासोबत घट्ट मैत्री असून देखील तिला लग्नाला का नाही बोलवले? अशा अनेक बातम्यांना चांगलेच उधाण आले होते. आता त्यातच पुन्हा एकदा सलमान खानची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्रीने थेट सलमान खानला लग्नाची मागणी घातली आहे.

ये है मोहबत्ते, नागीण सारख्या मालिकांमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने सगळ्याना वेड लावणारी अभिनेत्री अनिता हसनंदानी कायमच चर्चेत असते. आणि आता पुन्हा एकदा तिच्या नवीन व्हिडियोने सगळीकडेच चांगलीच खळबळ उडवली आहे. लग्न झालेलं असताना आणि एका बाळाची आई असताना देखील अनिताने सलमानला प्रपोज करत एका व्हिडियो बनवला आहे.

सध्या हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी या दोघांनी २०१३मध्ये लग्न केले होते. त्यानंतर पासूनच ते सगळ्यांना कपल गोल्स देतच आहेत. हे दोघे टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर आणि परिपूर्ण जोडप्यांपैकी एक समजले जातात. काहीच दिवसांपूर्वी अनिताने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

त्यांनी आपल्या बाळाचे नाव आरव असे ठेवले आहे. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अने मजेदार व्हिडिओ देखील शेअर करत असतात. दोघांचे व्हिडिओ अनेकवेळा व्हायरल होत असतात. अनिताने सलमान खानला लग्नाची मागणी घालताना एक व्हिडियो शेअर केला आहे. बघता बघता हा व्हिडियो तुफान वायरल झाला.

‘मी तुझ्याशी लग्न करणार आहे’ असे अनिता या व्हिडियोमध्ये वारंवार म्हणताना दिसत आहे. अनिताने यात पुढे लिहिले आहे की, ‘सॉरी रोहित बेबी, मला या वर्षी किमान एक रील प्रामाणिकपणे बनवायाची होती.’ अनिता हसनंदानीचा हा व्हिडिओ चांगलाच मजेदार आहे. तिचा हा व्हिडियो अनेकजण शेअर करत आहेत आणि त्यावर भन्नाट कमेंट्स देखील करत आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.