एकाच मंडपात आई आणि मुलीने केले लग्न, पहा 20 वर्षाची मुलगी आणि 53 वर्षाची आई दोघींनी एकाच वेळी…..

एकाच मंडपात दोन्ही आई व मुलीचे लग्न झाले, हे वि’चित्र वाटेल पण हे खरे आहे. या अनोख्या लग्नात मंडपात दोन पिढ्यांनी सात फेरे घेतले. या मंडपात सामुहिक 63 विवाह सोहळा चालू होता पण चर्चा फक्त एका लग्नाची होती. आई आणि मु’लीच्या या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मूळ शहर गोरखपूर येथील मंडपात आई व मुलीचे एकाच वेळी लग्न झाले. पहिल्या मुलीचे कन्यादान करून आई बेला हिने आईचे आपले कर्तव्य बजावले. यानंतर तिने स्वत: नवरी चा पोशाख घातला आणि त्याच मंडपात आपल्या जोडीदाराबरोबर लग्न केले.
मुलगी इंदूच्या लग्नानंतर आई बेलाने त्याच मंडपात केले लग्न:- गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री गट विवाह योजनेत 63 जोडप्यांनी एकत्र लग्न केले. या लग्नाच्या सोहळ्यात आई आणि मुलीने सर्वांची लक्ष वेधले होते. पिपरौली गावच्या आई आणि मुलीनेही आपल्या जोडीदारासह येथे लग्न केले.
या मुख्यमंत्री सामुहिक विवाह योजनेंतर्गत पिपरौली गावच्या बेला देवीने तिच्या मुलीचे लग्न लावून दिले होते. या योजनेत त्यांची छोटी मुलगी इंदूचे पालीच्या राहुलशी लग्न झाले होते. खास गोष्ट म्हणजे मुलीचे कन्यादान केल्यानंतर आईने या मंडपात स्वतः लग्न केले.
याच मंडपात बेला देवीने 55 वर्षांच्या जगदीशशी लग्न केले. वयाच्या या टप्प्यात असताना तिने आपला जीवनसाथी निवडून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. मुला-मुलींच्या लग्नानंतर बेला देवीला एकटे राहणे सोपे वाटत नव्हते. बेला आणि तिचा जोडीदार जगदीश यांनी मुले व कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
बेला 25 वर्षांपूर्वी वि’धवा झाली होती:- बेला देवी हिचा पती पिपरौली गावा मध्ये 25 वर्षांपूर्वी नि-धन झाले होते. पहिल्या पतीपासून बेलाला दोन मुले आणि तीन मुली आहेत. 25 वर्षांपासून एकट्या राहणाऱ्या बेलाने कुटूंबाच्या सल्ल्यानंतर स्वत:च्या प’तीच्या भा’वाशी लग्न केले आहे.
पिपरौली गावातील कुरमाऊळ येथे राहणारा जगदीश हा बेलाच्या पतीचा लहान भाऊ आहे. 55 वर्षांचा जगदीश, जो आपल्या कुटुंबाची शेती करून पालन पोषण करत होता, तो अविवाहित होता. जेव्हा दोघांना सामूहिक विवाह कार्यक्रमाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याच मंडपात एकत्र लग्न करण्याचे ठरविले.
मुलीच्या लग्नानंतर या दोघांनीही आपल्या लग्नाच्या विधी पार पडला. लग्नात साक्षी म्हणून बीडीओ डॉक्टर सीएस कुशवाह उपस्थित होते. त्यांचे हे लग्न बघून उपस्थित सर्व लोक है’राण झाले होते. तिथे आलेल्या लोकांसाठी ही एक अनोखी घटना होती. क्वचितच असे घडले असेल की, एकाच मंडपात मुलगी व आई दोघेही नववधू बनतील आणि लग्न करतील.