इतिहासातील एकमेव हिंदू शासक ज्यांच्या होत्या 35 मुस्लिम राण्या, यांच्या नुसत्या नावानेच मुस्लिम शासक थरथर कापत होते….

आपणा सर्वांना माहितीच आहे की सुरुवातीपासूनच आपल्या भारतावर अनेक परकीयांनी आक्रमण केले होते आणि आपला भारत अनेक काळ परदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला होता. यापैकी बहुतांश आक्रमण हे मुस्लिम राज्यकर्त्यांनी केले होते.
परंतु या परदेशी मुस्लिम शासकांच्या त्रा-सापासून आपल्या भारताला मुक्त करणार्या हिंदुत्वनिष्ठांची सुद्धा कमतरता भारतात नव्हती. इतिहासांच्या पानांचा सखोल अभ्यास करून आम्ही ही माहिती घेवून आलो आहोत.
आम्ही ज्या हिंदू शासकाचा उल्लेख करीत आहोत त्यांचे नाव बप्पा रावल असे आहे, बाप्पा रावल यांचे राज्य सातव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत होते. बप्पा रावल हे मेवाड राज्यातील गुहिल राजपूत घराण्याचे संस्थापक होते आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की महाराणा प्रताप याच वंशाचे होते ज्यांनी मुघलच्या अकबर बादशहाला देखील हरवले होते.
बप्पा रावल यांनीच मोहम्मद कासिमचा पराभव केला आणि सिंध प्रांत जिंकला. आपल्या 19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कोणतीही लढाई कधी हरली नाही. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला कारण बप्पा रावल यांना असे वाटत होती की प्रत्येक शासक हा त्यांच्या नावाने थरथर कापतो आणि आता त्यांना आव्हान देणारे कोणताही शासक उरला नाही.
बप्पा रावल यांची अजून एक आ-श्चर्यकारक गोष्ट म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी बप्पा रावल यांच्याकडे 100 राण्या होत्या, त्यापैकी 35 राण्या या मुस्लिम होत्या. बप्पा रावळ यांनी अनेक मुस्लिम शासकाचा पराभव केला आणि त्यांच्या बेगम आणि मु-लींशी लग्न केले.
बप्पा रावल हे मेवाडी घराण्याचे सर्वात शक्तिशाली योद्धा होते. त्यावेळी भारताचा दुसरा कोणता योद्धा त्यांच्या पराक्रमाशी साम्य साधू शकत नव्हता. हे एक असे राजा आणि योद्धा आहेत ज्यांच्यावर अनेक राजस्थानी लोकगीते लिहली गेली आहेत.
इस्लामची स्थापना झाल्यानंतर लगेचच अरब मुस्लिमांनी इराण जिंकल्यानंतर भारतावर आक्रमण करण्यास सुरवात केली. बरेच वर्षे त्यांचा पराभव होत राहिला. परंतु अखेरीस मुस्लीम शासक दाहिरच्या कारकिर्दीत सिंध जिंकण्यात त्यांना यश आले. त्यांना सिंधच्या पलीकडे जावून पूर्ण भारत जिंकण्याची त्यांची इच्छा होती, परंतु बप्पा रावल हे एका भक्कम भिंतीप्रमाणे त्यांच्या मध्ये उभे राहिले.
बप्पा यांनी अजमेर आणि जैसलमेर सारख्या छोट्या राज्यांनाही एकत्र केले आणि एक शक्तिशाली शक्ती निर्माण केली. त्यांनी बर्याच वेळा अरबी मुस्लिमांना पराभूत केले आणि त्यांना सिंधच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंतच राहण्यास भाग पाडले, जे आजकाल बलुचिस्तान म्हणून ओळखले जाते.
बप्पा खूप शक्तिशाली राजा होते. बप्पाचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्यांनी अरबी मुस्लिमांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येच अडवून ठेवले. बप्पाच्या सैन्याच्या स्थानामुळेच पाकिस्तानमधील एका शहराचे नाव रावलपिंडी असे ठेवले गेले. अठराव्या शतकात मेवाडची स्थापना करणाऱ्या बप्पा यांचा एकच उद्देश होता तो म्हणजे भारतीय सीमेबाहेरील परकीय आक्रमणांचा प्रतिकार करून त्यांना सीमेबाहेरच अडवून ठेवणे.