आश्चर्य ! भारतातील ‘या’ राज्यातील शाळांमध्ये मुलांना दाखवले जातील समलैं’गि’क सं’बंधांवरील चित्रपट..

अभिनेत्री सोनम कपूरचा आपल्या वडिलांसोबत ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. समलै’गिं’क विषयावर आधारित या सिनेमाला, अनेकांनी वेगवेगळा प्रतिसाद दिला. काहींना तो सिनेमा आवडला तर काहींनी त्यावर भरभरून टी’का देखील केली. मात्र, समलैं’गि’क वि’षयावर आज देखील आपल्या देशामध्ये उ’घडपणे बोलले जात नाही.
अनेकांना अजूनही तो केवळ एक आ’जार वाटतो. पण कधी कोणावर प्रे’म करायचं हे, आपल्या हातात नसत. समलैं’गि’क असणं हा गु’न्हा नाहीये, ती मनातील खरी भावना आहे. ही गोष्ट अजूनही आपल्या समाजाने मान्य केली नाहीये. पण, यामध्ये बदल घडला पाहिजे. याच दृष्टीने कोलकाताच्या काही शाळांनी एक नवीन उपक्रम राबवला आहे.
LGBTQ तरुणांना आपले खरे अस्तित्व समजावे आणि इतरांचे देखील अस्तित्व स्वीकारावे यासाठी, कोलकाताच्या शाळांमध्ये समलैं’गि’क वि’षयावर आधारित काही लघुपट दाखवण्यात आले. या चित्रपटांचे दिग्दर्शन, सलीम शेख, मनीष चौधरी, सप्तर्षी रे आणि अविजित मर्जीत या चार जणांनी केले आहे. शेख यांनी ‘द्वितियो पुरुष’, ‘देखा’ आणि ‘दख्खिना’ या तीन लघुपटांचे दिग्दर्शन केले होते, तर चौधरी यांनी ‘धोरा पोरे घेची आमी’, ‘दत्तो ‘ आणि ‘देया निया’ या चित्रपटांचे शूटिंग केले होते.
‘डरबिन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सप्तर्षी रे यांनी केले होते आणि अविजित मर्जीत यांनी ‘डंबेल’ चे दिग्दर्शन केले होते. प्रसायम व्हिज्युअल बेसिक्स नावाच्या UNICEF आणि Adobe समर्थित स्टुडिओचे, हे चारही दिग्दर्शक विद्यार्थी आहेत. या आठ लघुपटाची निवड, बॅड अँड ब्युटीफुल वर्ल्ड फेस्टिव्हलसाठी झाली होती. आणि आता तेच लघुपट, शाळा उघडल्यानंतर कोलकातामधील शाळांमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
सलीम शेख यांचा ‘देखा’ या चित्रपटात समलैं’गिक'(g’ay) मुलगा, त्याच्या वडिलांच्या भेटीच्या शोधात असतो, असं कथानक आहे. त्याचा दुसरा चित्रपट, दक्षिणा हा पुरुष एस्कॉर्टच्या प्रतिष्ठेवर आधारित आहे. सलीम शेख हा केवळ २३ वर्षांचा तरूण आहे. आपल्या चित्रपटांच्या कथानकांबद्दल बोलताना तो म्हणतो की, ‘माझे काही मित्र पुरुष एस्कॉर्ट आहेत.
त्यांच्यासाठीसुद्धा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे. म्हणून आपली व्यथा कुठे तरी समाजापुढे आली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. हा चित्रपट बनवून, मला त्यांच्या जीवनाच्या निवडीबद्दल त्यांच्या स्वाभिमानाबद्दल समाजात असलेला समज मोडीत काढण्याचा प्रयत्न मी केला आहे.’ मनीष चौधरीचा ‘दिया’ हा लघूपट एक अपरिचित व्यक्ती आणि फूड डिलिव्हरी बॉय यांच्यातील नातेसं’बं’ध आणि व’र्गीय भे’दांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर आधारित आहे.
याबद्दल मनीष चौधरी म्हणाले, ‘केवळ १५ मिनिटांत, अशा सं’बंधांबाबात सामाजिक-आर्थिक अडथळे आणि मोठ्या सम’स्या कशा निर्माण होतात. हे शोधण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे.’ सप्तर्षी रे यांच्या डरबिन लघूपटांमध्ये एका पत्रकाराने त्याच्या लिव्ह-इन-पा’र्टनरला त्याच्या वडिलांच्या नि’ध’नानंतर आणि त्याच्या गु’पितांबद्दल माहिती झाल्यानंतर आलेल्या सं’कटाबद्दल, यामध्ये दाखवण्यात आले आहे.
त्याने दावा केला आहे की, ‘ही कथा ऐकून या लघूपटात काम करणारे कलाकार परत गेले होते. म्हणून या लघुपटांचे प्रदर्शन करणे किती महत्वाचे आहे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच मी आग्रहाने हा सिनेमा प्रदर्शित केला.’ प्रस्यमचे संचालक प्रशांत रॉय, या सर्व प्रकरणाबद्दल बोलताना म्हणाले, ‘स्क्रीनिंगचा मुख्य उद्देश समावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देणे हाच आहे.
जेणेकरून LGBTQ तरुणांना हा समाज वेगळा किंवा नकोसा वाटला नाही पाहिजे.’ एका वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, या लघुपटामध्ये समलिं’गी सं’बंधांवर प्रकाश टाकणाऱ्या काल्पनिक कथांचे चित्रण करण्यात आले आहे. आपली ओळख, येणारे सं’कट, बाल शो’ष’ण, सह’वास आणि बरेच काही यासारखे विषय या लघूपटातून मांडण्यात आले आहेत. पुढील महिन्यात ३ डिसेंबरला, कालांजली आर्ट स्पेस येथे या चित्रपटांचा प्रीमियर होणार आहे.