आश्चर्य ! भारतातील ‘या’ गावातील पोरांना माहित नाही त्यांचा बाप कोण, कारण वाचून थक्क व्हाल..!

आश्चर्य ! भारतातील ‘या’ गावातील पोरांना माहित नाही त्यांचा बाप कोण, कारण वाचून थक्क व्हाल..!

बालपणी कोणत्याही मुलांसाठी आपल्या आई वडील हेच आपले रोल मॉडेल असतात. आपले आई-वडील यांच्याकडे बघूनच मुले शिकतात, त्यांचे अनुकरण करत त्यांच्यासारखे वागायचे प्रयत्न करतात. त्यानंतर मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने मी अमुक एकाचा मुलगा किंवा मुलगी असे सगळ्यांना सांगतात. तीच त्यांची ओळख बनून जाते.

आपल्याकडे मुले दोन तीन वर्षाची झाले की, कुटुंबातील सर्व सदस्य त्यांना त्यांच्या पालकांबद्दल सांगायला सुरुवात करतात. त्यामुळे त्या मुलांना त्याच्या वडिलांचे आणि आईचे नाव ध्यानात राहते. त्यानंतर कोणीही विचारल्यावर ती मुले आपल्या आई- वडिलांचे नाव सांगतात. आपल्या आई- वडिलांचे नाव हीच आपली खरी ओळख असते.

मात्र कदाचित तुम्हाला ध’क्का बसेल की, भारतात एक असे गाव आहे जिथे मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल काहीच माहित नाही. होय मध्यप्रदेश मधील पन्ना जिल्ह्यात हे अतिशय वेगळे आणि अनोखे गाव आहे. येथील मुले त्यांच्या वडिलांना ओळखत नाहीत. म्हणूनच या गावाला ‘मिसिंग फादर्स’ अशी एक नवीन ओळख मिळाली आहे. या गावांमध्ये जवळपास सहाशे लोक राहतात.

मात्र या गावातील मुले आपल्या वडिलांना ओळखत नाही. यामागचे प्रमुख कारण आहे बेरोजगारी. पन्ना जिल्ह्यातील मानकी गाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. मानकी गावाला लोक हरवलेल्या वडिलांच्या नावाने ओळखू लागले आहेत. या गावातील बहुतांश पुरुष कामाच्या शोधात गावाच्या बाहेर राहतात. हे छोटेसे गाव दुष्काळाने होरपळून निघाले आहे.

म्हणूनच या गावातील 70 टक्के पुरुषांना गावातील बारा मजूर आणि मोलमजुरी करून जगावे लागत आहे. मानकी गावातील लोक कामाच्या शोधात दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करतात.मानकी बर्‍याच दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे भीषण दुष्काळ पडला आहे. म्हणून गावात शेती करणे अशक्य झाले आहे.

त्यामुळे केवळ पुरुषच नाही तर, कुटुंबातील महिला देखील कामाच्या शोधात गाव सोडून शहरांकडे जात आहेत. या गावातील बहुतांश महिला पतीसोबत बांधकामाच्या ठिकाणी देखील काम करतात. घराचा खर्च भागवण्यासाठी आणि पोटाची खळगी भागवण्यासाठी या महिला गरोदर अवस्थेत देखील काम करत आहेत. गरोदर अवस्थेत सुरुवातीच्याच काळात नाही तर, सातव्या आणि आठव्या महिन्यात देखील त्यांना काम करावे लागत आहे.

ज्यावेळी या महिलांची प्र’सूतीची वेळ येते तेव्हा त्या गावी परततात. याच वेळी मुले मोठी होतात. तेव्हा गावातील इतर कुटुंबातील सदस्यांसह आपल्या मुलांना सोडून त्या महिला कामावर परततात. या गावातील महिलांसाठी सुरक्षित प्र’सूतीची सुविधादेखील नाहीये. याचा फटका त्यांना व त्यांच्या मुलांना स’हन करावा लागत आहे. गावात एक सुद्धा दाई नाहीये. त्यामुळे तिला कोणत्याही रुग्णालयात नेता येत नाही.

रुग्णालय देखील खूप जास्त अंतरावर आहे. सोबतच गावात पुरुष देखील नाही म्हणून घरातील महिला चक्क घरातच प्र’सूती करतात. हा सर्व प्रकार अतिशय भयं’कर असून विचार करायला लावणारा आहे. जिथे आपण चंद्रावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न बघत आहोत तिथे, आपल्या देशातील काही ठिकाणी जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या सोयी देखील उपलब्ध नाही.

याचे प्रमुख कारण बे’रोजगारी आहे. देशातील बे’रोजगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 2011 मध्ये मध्य प्रदेशात विस्थापनाचा आकडा 1 कोटी 85 लाख होता यापैकी 50 लाख केवळ ग्रामीण भागातील लोक होते. देशात उद्भवणारी ही परिस्थिती अतिशय भ’यंकर असून याचे विपरीत प’रिणाम भवि’ष्यात भोगा’वे लागतील हे नक्की.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.