आश्चर्य ! पोट भरण्यासाठी भीक मागते पण इंग्रजी बोलण्यात भल्याभल्यांना देते पिछाड, Video पाहून तोंडात बोट घालाल..

आश्चर्य ! पोट भरण्यासाठी भीक मागते पण इंग्रजी बोलण्यात भल्याभल्यांना देते पिछाड, Video पाहून तोंडात बोट घालाल..

आपल्या देशामध्ये कौशल्याची म्हणजेच टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीये. कितीही रियालिटी शो असले, किंवा कितीही वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले तरीही अनेक टॅलेंटेड लोकांनी आपली कला, कौशल्य दाखवण्याची संधीच मिळत नाही. माघील काही वर्षांपासून, देश खूप मोठ्या आर्थिक टंचाईचा सामना करत आहे.

अनेकांनी आपले उद्योग बंद केले, तर काहींना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. यामुळे अनेकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे खूप जास्त नुकसान देखील झाले आहे. अशा परिस्थतीमध्ये अनेक चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकं देखील मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह करत असल्याचे दुर्दै’वी चित्र आपल्याला बघायला मिळत आहे.

ज्यांना काम मिळत आहे, ते अजून चांगल्या कामाच्या शोधात आहेत. तर ज्यांच्याकडे काहीच काम नाही ते कामाच्या शोधात आहेत. काम मिळत नाही म्हणून काहींना भीक मागून आपल्या पोटाची खळगी भरावी लागत आहे. असच एक दृश्य वाराणसीमध्ये बघायला मिळत आहे. तेथील रस्त्यावर एक महिला इंग्लिशमध्ये भीक मागत आहे. बसला ना धक्का? पण सर्वाना आश्चर्याचा धक्का देणारा हा व्हिडियो सोशल मीडियावर सगळीकडेच तुफान वायरल होत आहे.

शारदा अविनाश त्रिपाठी या नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये, कोणत्यातरी दुकानाच्या पायऱ्यांवर एक हलक्या आकाशी रंगाच्या साडीमध्ये एक महिला बसलेली दिसत आहे. या महिलेच्या गळ्यात एक गुलाबी रंगाची स्लिंग बॅग आहे, आणि तिने बॉय कट केलेला आहे.

व्हिडियो बनवणारा युझर तिला तीच नाव विचारतो. त्यावेळी ती आपले नाव स्वाती असल्याचे सांगते. याच व्हिडियोमध्ये ती इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात करत सांगते की, ‘माझं नाव स्वाती आहे. मी मूळची दक्षिण भारतातील आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये मी ग्रॅज्युएट केलं आहे. माझ्या एका मुलाला जन्म देत असताना, डॉ’क्टरांच्या चुकीमुळे शरीराची डावी बाजू पॅ’रालाइ’ज्ड झाली.

असं असलं तरीही मी काम करू शकते. पण यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. परिणामी स्वतःचे पोट भरण्यासाठी मला भीक मागावे लागत आहे. माघील ३ वर्षांपासून मी वाराणसी मध्ये आहे. पण वाराणसीमध्ये परिस्थती खूपच विचित्र आहे. माझ्यासारखे अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहे. मला कोणत्याही पुनर्वसन केंद्रामध्ये जाण्याची इच्छा नाहीये.

मला काम करण्याची इच्छा आहे. कारण कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रामध्ये अशी अनेक काम आहेत, जे एक बाजू परलायज्ड असून देखील मी करू शकते. मी काम शोधण्याचा खूप प्रयत्न केला आणि अजूनही करत आहे. पण मला काम मिळतच नाहीये.

आता नाईलाज म्हणून मी भीक मागत आहे.’ तिच्या या व्हिडियोने अनेकांना चकित केलं आहे. भीक मागणारी महिला सुशिक्षित असून फडाफड इंग्लिश बोलते हे बघून अनेकांनी तोंडात बोटं घातले आहेत. मात्र, ग्रॅजुएशन करुन, शिक्षण पूर्ण करून देखील कोणाला रस्त्यावर भीक मागावी लागणे सर्वात मोठं दुर्दै’व आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.