आशिया कप आधीच भारत आणि पाकिस्तान संघासाठी आली अतिशय वाईट बातमी…

आशिया कप आधीच भारत आणि पाकिस्तान संघासाठी आली अतिशय वाईट बातमी…

खेळ विश्वामध्ये सध्या ‘एशिया कप 2022’ ची धूम बघायला मिळत आहे. वर्ल्ड कप जिंकण्या इतकच भारताला एशिया कप जिंकणे देखील महत्त्वाचे ठरते. क्रिकेट विश्वामध्ये सध्या याबद्दलची चर्चा बघायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट संघ देखील एशिया कप साठी सज्ज झाला असून खेळाडू आपले उत्तम प्रदर्शन देण्यासाठी तयार आहेत.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून क्रिकेटच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत .आता एशिया कप म्हणून ओळखला जाणारा हा सामना काही वर्षांपूर्वी शारजा कप म्हणून ओळखला जात होता. हा किताब आपल्या नावे करण्यासाठी एशिया खंडातील सर्व देश एकमेकांना कडवी झुंज देतात.

खास करून भारत- पाकिस्तान सामन्यासाठी सर्वोच्च राहते उत्सुक असतात. जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागलेले असते. आजपर्यंत शारजा कप म्हणजेच एशिया कपचा किताब भारताने सर्वाधिक वेळा जिंकला आहे. येत्या 27 तारखेपासून एशिया कपच्या सामन्यांची सुरुवात होत आहे.

भारताप्रमाणेच पाकिस्तानी संघ देखील या कप साठी चांगला सराव करून कडवी झुंज देण्यास तयार झाला आहे. परंतु आता भारतासाठी एक चिंता चिंतेची बाब समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसपित बुमराह आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे एशिया कप मधून बाहेर पडला आहे. सध्या तो एमसीए मध्ये आहे.

त्यामुळे आता भारतीय क्रिकेट संघाची डोकेदुखी वाढली आहे. केवळ भारतीय संघाचाच नाही तर पाकिस्तानच्या संघाची देखील डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. पाकिस्तानचा अजून एक वेगवान गोलंदाज गुडघ्याच्या दु’खा’पतीमुळे एशिया कप मधून माघार घेत आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या गुडघ्याच्या दु’खा’पतीमुळे एशिया कप मधून माघार घेतली आहे. त्यामुळे आता दोन्ही संघातील उत्कृष्ट गोलंदाज बाहेर पडल्यामुळे संघातील कर्णधाराची चिंता वाढली आहे. या दोन खेळाडूं शिवाय अजून काही खेळाडू आहेत जे दुखापतीमुळे एशिया कप मधून बाहेर पडू शकतात.

बांगलादेशचा नावाजलेल्या खेळाडू नूरुल हसन बोटाच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत तो खेळू शकेल की नाही याबद्दल अजूनही प्रश्नचिन्हच आहे. त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दूषमंता चमीरा देखील दु’खा’पतीने त्र’स्त आहे. घोट्याच्या दु’खा’पतीने मागील बऱ्याच काळापासून दूषमंता त्र’स्त आहे.

अद्यापही या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे स्पर्धेदरम्यान त्याला कोणत्याही क्षणी आपला फिटनेस सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते. फिटनेस सिद्ध करण्यात तो अयशस्वी ठरला तर अशिया कप मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. हे खेळाडू जरी एशिया कप मधून बाहेर पडणार असले तरीही एशिया कप साठी खेळाडूंमध्ये असणारा उत्साह कमी झालेला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना अनेक चुरशीचे सामने बघायला मिळणार हे मात्र नक्की.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.