आवळा खाल्याने फक्त शरीराची इम्यूनीटीच वाढत नाही तर ‘या’ रोगांपासून देखील मिळते मुक्तता, पहा आवळ्याचे अनेक गुणकारी फायदे…

आवळा खाल्याने फक्त शरीराची इम्यूनीटीच वाढत नाही तर ‘या’ रोगांपासून देखील मिळते मुक्तता, पहा आवळ्याचे अनेक गुणकारी फायदे…

आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आहे. यातील पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला असंख्य लाभ मिळतात. तुम्ही कोणत्याही स्वरुपात आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला केवळ लाभच मिळणार आहेत.

कोरोनाच्या या दिवसात आपले शरीर निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. शरीरात कोणत्याही प्रकारच्या रोगामुळे कोरोना संसर्गाचा धोका अनेक पटीने वाढतो आपल्या आहारात आवळा समाविष्ट केल्यास आपण बर्यााच प्रकारच्या आजारांपासून मुक्त होऊ शकता. आवळामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात जे आपल्या शरीराचे पोषण करतात आणि आपल्याला रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

-आवळा खा. चेहरा सतेज राहतो, म्हणजे चेहरा तरुण दिसतो.>- आवळा खा. केस वाढीला लागतात, मग टक्कल पडणार नाही.>- आवळा खा. नजर साफ़ राहील, चश्मा लागणार नाही.

आहारात आवळा सेवन केल्याने आपल्या त्वचेला आणि केसांना आवश्यक पोषण मिळते यामुळे आपले केस आणि त्वचेची समस्या दूर होते. आवळा मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे आपल्या प्रतिकारशक्तीस मदत करतात.

म्हणूनच, कोरोना संक्रमणाच्या काळात तुम्ही रोज आवळा खाऊ शकता आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवू शकता, यामुळे कोरोना संक्रमणापासून तुमचा बचाव होईल. आवळ्या मध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर आणि खनिजे असतात. जे आपल्या शरीराचे पोषण करून आपल्यास रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

आवळामधील व्हिटॅमिन-सी आपले प्रतिकारशक्ती बळकट करण्यास मदत करते आणि फायबर आपल्या शरीराचे वजन आणि लठ्ठपणा कमी करते हिरवे रंग असणारे या आवळ्या मध्ये अनेक फायबर असतात जे तुमची पाचक प्रणाली मजबूत ठेवतात आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य राखतात. हे आपल्या शरीरास मधुमेहाच्या जोखमीपासून देखील दूर ठेवते.

तर हृदयाला कॉलेस्टॉरॉल पासून वाचवणारे औषध म्हणजे आवळा होय. कॉलेस्टॉरॉल दोन प्रकारची असतात एलडीएल आणि एचडीएल. या पैकी एलडीएल कोरोनरी आर्टरी म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये साचते आणि रक्ताचा पुरवठा कमी होतो. असे झाले की हार्टअटॅक येतो. आवळ्याच्या प्राशनाने हे वाईट कॉलेस्टॉरॉल कमी तयार होते. हृदय मजबूत असेल तर आपण हवे तेव्हढे प्रेम करायला मोकळे.

याशिवाय आवळा सेवन केल्याने कर्करोग आणि हृदयाशी सं*बंधित आजार होण्याचा धोकाही कमी होत असतो आपण आपल्या आहारात आवळा चटणी, लोणचे आणि मुरंबाच्या अश्या कोणत्याही रूपात घेऊ शकता.

आवळा म्हणजे अखंड तारुण्याचा स्त्रोत आहे. आवळ्यात अँटीऑक्सीडंटसचा भरपूर साठा असतो. शरीराच्या पेशींचे आयुष्य वाढवण्याचे कार्य आणि फ्री रेडिकल कमी करणे ही दोन्ही कामे आवळा उत्तमरीतीने करतो. जर चेहरा प्रौढत्वाच्या अकाली खुणा दाखवत असेल तर आजच आवळा किंवा आवळा खायला सुरुवात करा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *