आश्चर्य ! आजही त्या स’माधीवरून उडणारे प’क्षी पडतात बे’शुद्ध, माणसाचा विषय तर सोडूनच द्या….

आपला देश विज्ञानात विकासाचे नव-नवीन शिखर गाठत आहे. मात्र आपल्या देशामध्ये विज्ञानासोबत धा’र्मिक विज्ञानालाही खूप महत्व आहे. अनेक च’कित करणारे आ’श्चर्य आपण किंवा आपल्या आस-पासच्या लोकांनी स्वतःच्या उ’घड्या डो’ळ्यांनी पाहिलेले आहेत. विज्ञानाच्या पलीकडे जाऊनही झालेले खूप च’मत्कार आपण पहिले आहेत. साहजिकच त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा प्रत्येकाचा वयक्तीगत विचार आहे. मात्र एक दैवी शक्ती ह्या जगात अस्तित्वात आहे, आणि तीच हे जग चालवते हे सर्वच मान्य करतात.
परवा एका गावी जाण्याचा योग आला. तेथील महादेवाचे मंदिर खूप भव्य आणि पुराणिक असून खूप सुंदर आहे असे ऐकले होते. बीड जिल्ह्यातील ‘पिंपळवंडी ‘ असे त्या गावाचे नाव आहे. ‘अश्वलिंग ‘ म्हणून तेथील महादेवाच्या मंदिराला संबोधले जाते. मंदिर खरोखर अत्यंत पुराणिक असून, तिथे जाऊन दर्शन घेताना मन अगदी प्रसन्न झाले.
त्यावेळी ऐकायला भेटले ह्या गावात ‘तुळजाभरती ‘ नावाचे योगी राहत असत. गावातील तळ्याच्या पलीकडे त्यांची समाधी व छोटेसे मंदिर आहे. इथपर्यंत आलोच आहोत तर तिकडेही जाऊ असे सर्वांचे ठरले. जाताना आमच्यासोबत एक मध्यमवयीन गृहस्थ आले.
तिथे पोहचत असताना रस्त्यात दोन प’क्षी प’ड’लेले दिसले, आपले पं’ख ह’लवण्याचा ते प्रयत्न करत होते मात्र त्यांना त्यांच्यामध्ये तेवढे ट्रेन बाकी नाही असे दिसत होते. आम्ही पुढे जाण्याआधीच, सोबत आलेल्या मध्यमवयीन गृहस्थाने त्या प’क्षा’ला आपल्या ओंजळीमधून पाणी पिऊ घातले आणि उचलून हळूच बाजूला ठेवले. ‘होशील बरा, दम धर अजून काही वेळ,’ असे त्या प’क्षाला ते बोलले आणि आम्हाला पुढे चला असे खुणावले.
न राहवून आम्ही विचारले, तुम्ही त्या प’क्षा’ला असे का बोललात ? तुम्ही वैद्य वगैरे आहेत का ? तेव्हा अगदी हसून त्यांनी उत्तर दिले,’नाही नाही मी काय वैद्य नाही. दुपारच्या वेळेला असच होत बघा, इथून जे पण प’क्षी उ’डत असतात आज पण बे’शुद्ध होऊन पडतात. आम्ही पण कोणी गावातले लोक दुपारी नाही येत इकडं, नियमच आहे ना तसा. ‘
पुढे आम्ही त्याचे कारण विचारले तर त्यांनी सांगितले, ‘तुळजाभरती खूप मोठे त’पस्वी होते. प्रातःकाळी आपली सर्व पूजा संपूर्ण करुन ते दुपारी ध्यान करत असत. ज्यावेळी ते ह्या परिसरात ध्यान करत असत, त्यावेळी एखादा माणूस तर सोडाच परंतु नकळत जर कोणता प’क्षी उ’डत असेल, तर तोदेखील मू’र्च्छित होऊन प’डायचा. त्यांच्या तपाची ऊर्जा इतकी जास्त प्रबळ असायची. त्यांनी इथेच जि’वंत स’माधी घेतली. आणि स’माधी घे’तल्यानंतर आजही जेव्हा त्यांच्या ध्यान करण्याची वेळ असते, त्यावेळी आपण इकडे नाही येऊ शकत. व कित्येक वेळा आजही प’क्षी मू’र्च्छित होऊन पडतात…. ‘
आम्ही तिथे पोहचलो तेव्हा खरोखर एक प्रकारची ऊर्जा जाणवत होती. त्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टींमध्ये किती वास्तव होते हे ठाऊक नाही, मात्र आम्ही परत जाताना ते प’क्षी रस्त्यात नव्हते. कदाचित खरोखर ते, उ’डून गेले असतील.