आई, तुला नाई का ग आम्हाला मा’रून टाकावस वाटलं? औरंगाबादमधील त्या नि’दर्यी घटनेनंतर ‘या’ अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल…

ऑनर कि’लिं’ग हे आपल्या प्रगतशील समाजाचे भ’यान’क वास्तव आहे. जातीबाहेर किंवा कुटुंबाच्या मर्जीबाहेर लव-मॅरेज केल्यामुळे, अनेक जोडप्यांना आपल्या प्रा’णांना मुकावे लागते, यालाच ऑ’नर कि’लिं’ग असे म्हणतात. आज आपल्या देशाने चांगलीच प्रगती केली आहे. मात्र तरीही असे प्रकार दिवसेंदिवस घडतच आहेत.
यामुळे आपल्या समाजाच्या एक भ’यान’क चेहरा सर्वांसमोर येतो. नुकतच प्रेम विवाह केल्यामुळे औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे एका तरुणीची निर्मम ह’त्या करण्यात आली. यात सर्वात ध’क्कादा’यक बाब ही होती कि, जन्मदातीनेच आपल्या मुलाच्या मदतीने स्वतःच्या सख्ख्या लेकीची ह’त्या केली. या हृ’दयद्रा’वक घ’टनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हा’दरला आहे.
या भ’यान’क प्र’करणावर, सर्वच स्तरांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीज पर्यंत अनेकांनी या प्रकरणात हळहळ व्यक्त केली आहे. यातच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील अभिनेत्रीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेत देवकीची भूमिका साकारणार्या मीनाक्षी राठोडने फेसबुकवर एक पोस्ट लिहित आपल्या भावना वाट दिली आहे.
या पोस्टमध्ये तिने वैजापूर तालुक्यातील तरुणीच्या ह’त्येबद्दल उल्लेख केला आहे. आणि त्याचबरोबर तिच्या कुटुंबातील लोक आं’तरजा’तीय विवाहकडे कोणत्या पद्धतीने बघतात, हे देखील सांगितले आहे. मीनाक्षीने लिहिले आहे की, ‘आई मोठ्या ताईचं इंटरकास्ट लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला.
मी पाहिले आहे. त्यावेळी ताईचा तुला किती राग आला असेल ना? माझं, कैलास सोबत इंटरकास्ट लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळपास तुला त्यांच्यात गृहीत धरण्यात सोडून दिलं होतं. त्यावेळी देखील तुला माझा किती राग आला असेल? पण कायम उसाचे पाचट अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारलेल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातील कॉलनी ही तुझ्या एका स्वीकाराणे, तुझ्यासोबत उभी राहिले!
काल परवा आपल्या लहान मुलीचं इंटरकास्ट लग्न मोठ्या थाटात लावून दिलं! आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जनरीत आहे हे सांगून दिले! हे स्वीकारायचं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला पाच मुली असताना सुद्धा तू स्वतःला एवढं कसं सांभाळलं? कसा राग कंट्रोल केलास ? बाबा नसतानादेखील तुला आम्हाला मा’रून टाकाव असं नाही का ग वाटलं?’
यातच पुढे ती लिहिते, ‘हे असंच ‘कीर्ती थोरे’च्या आईला का नाही वाटलं? एवढा राग अनावर होत असतो का प्रतिष्ठेपायी ? तिने तर जातीतच लग्न केलं होतं. तुझ्या एवढं नाही फक्त एकाच मुलीला स्वीकारायचे होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अ’मानुष’पणे खू’न करावा, असं वाटतं यापेक्षा क्रूर काय असू शकत या जगात?
काश, माझ्या आई सारखी आई किर्तीला देखील लाभली असती तर? आणि हो स्वप्नील शुभम सारखे भाऊ देखील प्रत्येक मुलीला लाभो! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्वीकारायच बियाणं सापडू दे ! काल परवाच सकारात्मक वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट आज ही घट’ना ऐकून अस्वस्थ करणारी आहे.
सगळ्या चिंता, रूढी-परंपरांना झुगारून हा जो Swag तू स्वीकारला आहेस, तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कस बदलते. हा swag खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो. हा स्वॅग प्रत्येक स्त्रीमध्ये येऊ दे.’ आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मीनाक्षीने अं’तरजा’तीय लग्न विषयी तिचे मत मांडले आहे. तिच्या आईने सध्याच्या युगात कशा पद्धतीने स्वतःला बदलून घेतलं व आपल्या मुलींच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली हे देखील सांगितल आहे.