‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने सोडली मालिका? मेकर्सनी घेतला ‘हा’ निर्णय. चर्चांना उधाण..

‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने सोडली मालिका? मेकर्सनी घेतला ‘हा’ निर्णय. चर्चांना उधाण..

अलीकडच्या काळात, मराठी मालिकांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक मराठी मालिकांचा टीआरपी, हिंदी मालिकांपेक्षाही जास्त आहे. या मराठी मालिका इतर भाषेत देखील बघितल्या जातात. माघील अनेक महिन्यांपासून, एका मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे.

आई कुठं काय करते, या मालिकेने अल्पावधीतच भरगोस यश संपादन केले. सुरुवातीपासूनच या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. आई कुठं काय करते, या मालिकेतील सर्वच पात्र देखील प्रेक्षांच्या पसंतीस उतरली. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, अभिषेक, यश, गौरी, इशा यासगळ्यांसोबतच आई-आप्पाचे पात्र देखील लोकप्रिय ठरले.

आपला स्वाभिमान जपण्यासाठी, एक स्त्री किती सहजपणे मोठाले निर्णय घेऊ शकते, यावर आधारित ही मालिका आज, महाराष्टाच्या घराघरात पोहोचली आहे. सध्या या मालिकेत अतिशय रोमांचकारी असे वळण बघायला मिळत आहे. त्यामुळे सध्या लोकप्रियतेमध्ये ही मालिका अव्वल असल्याचं दिसून येतं.

एक हाऊसवाइफ ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरुंधतीचा प्रवास प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या मालिकेला भरभरून प्रेम दिलं आहे. सध्या ही मालिका एका नव्या आणि निर्णयक वळणावर आली आहे. पण यासोबतच मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधतीने मालिका सोडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रसारित झाला आहे. त्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध आणि संजना यांच्यासोबत घरातील इतर सदस्य दिसत आहेत मात्र अरुंधतीचा कोणताही सीन नाहीये. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अरुंधतीनं म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनं काही वैयक्तीक कारणासाठी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असल्यानं मेकर्सनी आता अनिरुद्ध आणि संजनावर फोकस केलं आहे.

दरम्यान मालिकेमध्ये अरुंधती दिसत नसल्यानं तिने मालिका सोडली की काय असा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अशा चर्चा देखील सुरू होता. मात्र मधुराणीनं ही मालिका सोडली नसून तिने काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

या ब्रेकनंतर ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. या मालिकेत मधुराणी प्रभुलकर आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.