अशाप्रकारे बनवले जातात तुमचे फेव्हरेट चायनीज नूडल्स, हा video पाहिल्यानंतर चायनीज लव्हर खाणंच बंद करतील..

अशाप्रकारे बनवले जातात तुमचे फेव्हरेट चायनीज नूडल्स, हा video पाहिल्यानंतर चायनीज लव्हर खाणंच बंद करतील..

बदलत्या जीवनपद्धतीसोबत खाण्याच्या पद्धतीमध्ये देखील चांगलाच बदल झाला आहे. पूर्वी कधी तरी मेजवानी रंगायची. विशेष म्हणजे या मेजवानी मध्ये खाल्ले जाणारे जवळपास सर्वच पदार्थ घरीच बनवलेले असत. मात्र आता मेजवान्या रंगल्या तरीही, जवळपास सर्वच पदार्थ बाहेर बनलेले असतात.

चायनीज पदार्थ तर आज काल हमखास खाल्लेच जातात. छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजणांना चायनीज पदार्थ अवडतात. नूडल्स तर सर्वांचेच आवडीचे असतात. झटपट बनणारे आणि चमचमीत असे नूडल्स पहिले की, सर्वांनाच ते खावेसे वाटतात. मोठाल्या हॉटेल्समध्ये हजारो रुपयांना मिळणारे नुड्ड्ल्स चायनीज गाड्यांवर मात्र मुबलक किमतीत मिळतात.

त्यामुळे चायनीज गाड्यांवर देखील नूडल्स खाण्यासाठी गर्दी जमते. मात्र हे नूडल्स कसे बनतात याचा विचार कधी केला आहे का? याबद्दलच एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतो आहे. नूडल्स कसे बनवले जातात, याचा एक व्हिडियो वायरल होतो आहे.

हा व्हिडियो बघून अनेकजण चकित होत आहेत. नूडल्स फॅक्टरीचा हा व्हिडियो बघून सगळेच थक्क झाले आहेत. फॅक्टरीमध्ये नूडल्स कसे बनवले जातात, आणि त्यांचे पॅकिंग कसे केले जाते हे या व्हिडियोमध्ये दाखवले आहेत. या प्रक्रियेत किती घाण वापरली जाते, हे देखील तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

प्रथम मशीनमध्ये पीठ कसे भरले जाते, नंतर ते पीठ कागदाच्या रोलसारखे बनते, हे या व्हिडियोत दिसत आहेत. त्यानंतर, कणकेसारखा कागदाचा रोल दुसऱ्या मशीनमध्ये टाकला जातो, तेथून ते नूडल्सच्या रूपात लहान तुकड्यांमध्ये बाहेर येते. त्यानंतर ते नूडल्स एका घाणेरड्या डब्यात टाकून हलके शिजवले जातात आणि नंतर ते बाहेर काढून जमिनीवर फेकले जातात.

त्यानंतर एक मुलगा त्या नूडल्स प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करत जातो. यादरम्यान, नूडल्स बनवणाऱ्यांनी हातमोजेही घातले नव्हते त्यामुळे अनेकांना हा व्हिडियो बघताना किळस येत आहे. @chiragbarjatyaa नावाच्या आयडीवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

59 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 94 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे पाहिल्यानंतर आता नूडल्स खावेच वाटत नाहीयेत,’ असं एकाने प्रतिक्रिया दिली आहे. तर अजून एक युजर म्हणतो, ‘हे भयानक आहे.’ हा व्हिडियो सध्या आगीच्या वेगाने वायरल होतो आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *