अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज’ चित्रपटात वाजणार ‘या’ मराठी अभिनेत्याचा आवाजाचा डंका..

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज’ चित्रपटात वाजणार ‘या’ मराठी अभिनेत्याचा आवाजाचा डंका..

को’रो’ना म’हामा’रीनंतर साधारण दोन वर्षानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटाचे चित्रीकरण हे मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. दिवाळीच्या सुमारास अभिनेता अक्षय कुमार याचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्ये रणविर सिंह, अजय देवगन, कटरीना कैफ यांच्या देखील भूमिका होत्या.

चित्रपटामध्ये 1994 मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटातील ‘टिपटिप बरसा पाणी’ या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन दाखवण्यात झाले आहे. आजच्या तरुण पिढीला हे गाणे नवे आहे. मात्र हे गाणे 27 वर्ष जुन आहे, हे अनेकांना माहित नाही. मात्र, हे गाणे नव्या ढंगात देखील अतिशय सुमधुर असे तयार करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे.

आज आम्ही आपल्याला दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये एका मराठी अभिनेत्याने आपला डंका वाजवला आहे, याबाबतची माहिती देणार आहोत. एक दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये हाय बजेट चित्रपट तयार होत असतात. हिंदी चित्रपटाला साजेशे चित्रपट दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये तयार होत असतात. मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपट आता होत नाही.

मात्र, मराठीतील अनेक कलाकारांना दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये मोठे काम मिळते. त्यांना खूप मागणी देखील आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये अल्लू अर्जुन हा आघाडीचा अभिनेता म्हणून गणल्या जातो. अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा द राईस’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या 17 डिसेंबरला भारतभर प्रदर्शित होणार आहे. अनेक भाषांमध्ये देखील या चित्रपटाचे रिमेक वर्जन दाखवण्यात येणार आहे.

त्यामुळे त्या त्या भाषांमध्ये चित्रपट हा डब करण्यात आला आहे. या चित्रपटाचे ट्रेलर पाहूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन त्याच्यासोबत रश्मिका मंदांना हीदेखील दिसणार आहे. ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची आघाडीची स्टार म्हणून गणल्या जाते. या दक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रीमेकमध्ये श्रेयस तळपदे या मराठमोळ्या अभिनेत्याचे योगदान आहे.

श्रेयस तळपदे याने तेरा वर्षानंतर मराठी चित्रपट सृष्टीतील मालिकेमध्ये देखील आता पदार्पण केले आहे. माझी तुझी रेशीमगाठ त्याची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत त्याने यश ही भूमिका साकारली आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला श्रेयस तळपदे याने मालिकेतून सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या अभिनयाचा डंका वाजवला.

मराठीत त्याने अनेक हिट चित्रपट दिले. त्याचप्रमाणे हिंदी मध्ये त्याने इक्बाल सारखा जबरदस्त चित्रपट दिला होता. या चित्रपटाने त्याला नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर फराह खान आणि शाहरुख खान यांच्या ओम शांती ओम या चित्रपटातही त्याने भूमिका केली होती. रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये देखील त्याने आपलातुन असे काम केले आहे.

पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला श्रेयसने आपल्या आवाजात डब केले आहे. त्यामुळे श्रेयस या चित्रपटासाठी खूपच उत्सुक पाहायला मिळतो. या आधी श्रेयसने ‘द लॉयन किंग’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सिम्बाचा बेस्ट फ्रेंड टीमॉनच्या पात्राला आपला आवाज दिला होता.

आता प्रथमच तो तेलुगू चित्रपटासाठी आणि तेही नायकाच्या मुख्य पात्राला आपला आवाज देणार आहे. श्रेयस तळपदेने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. श्रेयस तळपदेचा आवाज ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पुष्पा हा तेलुगू चित्रपट सुकुमार बनरेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. चंदन तस्कर विरप्पनच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *