अरे व्वा ! पुन्हा एकदा अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेत दिसणार…

अरे व्वा ! पुन्हा एकदा अभिनेत्री तेजश्री प्रधानचे छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘या’ मालिकेत दिसणार…

तेजश्री प्रधान हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात ओळखले जाते. ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेने महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महिला वर्गाला अक्षरशः वेड लावले होते. याच मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवीची भूमिका आजही तिच्या चाहत्यांचा मनात आहे. झेंडा या सिनेमामधून तेजश्रीने मनोरंजनविश्वामध्ये पदार्पण केले होते.

मात्र या सिनेमामध्ये तिचे फारच कमी काम होते, त्या छोट्याशा रोलमध्ये देखील तेजश्रीने आपली वेगळी छाप सोडली होती. त्यानंतर शर्यत आणि लग्न पाहावे करून सारख्या सिनेमामध्ये देखील ती झळकली होती. त्याचसोबत होणार सून मी या घरची मालिकेत काम करण्याची संधी तेजश्रीला भेटली, आणि या मालिकेने तिला संपूर्ण महिलांचे आवडते पात्र बनवून टाकले.

ती सध्या काय करते, या सिनेमामधून तिने पुन्हा मोठया पडद्याकडे आपला मोर्चा वळवला होता. ती सध्या काय करते या सिनेमाने देखील चांगलेच यश मिळवले. त्यानंतर काही काळ ती अधून-मधून सोशल मीडियावर दिसत होती. मात्र चांगल्या कथनकाच्या शोधात असतानाच तिला झी मराठीच्या अग्गबाई- सासूबाई या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.

मालिकेचे कथानक नेहमीच्या मालिकांपेक्षा हटके होते, त्यामुळे तेजश्रीने लगेच होकार दिला. या मालिकेने देखील, टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. या मालिकेतील शुभ्राची भूमिका देखील चांगलीच आवडीची ठरली. आता पुन्हा एकदा तेजश्री एका मालिकेत मोठ्या भूमिकेत बघायला मिळणार आहे.

दिया और बाती हम या लोकप्रिय हिंदी मालिकेचे मराठी रिमेक, ‘फुलाला सुगंध मातीचा’ सध्या मराठी टेलिव्हिजन मधील सर्वात आवडत्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेचे कथानक आणि प्रेक्षकांना त्यासोबत बांधून ठेवण्यात मेकर्सला यश आले आहे. या मालिकेत रोज वेगळे आणि खास वळण बघायला मिळत आहे.

त्यामुळे सध्या मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. या मालिकेत सध्या शिर्डीमध्ये जत्रा भरली आहे. या जत्रेमध्ये आता एका खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अष्टपैलू व्यक्तिमत्व’ म्हणून एक स्पर्धा शिर्डीच्या जत्रेमध्ये आयोजित असल्याचे बघायला मिळत आहे. आणि आता याच वेळी मालिकेत तेजश्री प्रधानाची एंट्री होणार आहे.

या मालिकेमध्ये, दाखवण्यात येणाऱ्या आयोजित अष्टपैलु स्पर्धेमध्ये, कीर्ती सहभागी होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र त्याहून अधिक अजून एका गोष्टीसाठी संपूर्ण चाहते आतुर आहेत. या स्पर्धेचे सूत्रसंचालन आता तेजश्री प्रधान करणार आहे.

त्याबद्दलचा एक प्रोमो देखील स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये आता अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून किर्तीला नवीन परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि या परीक्षेमध्ये तेजश्री तिची साथ देणार की, तिच्या अडचणीत भर घालणार हे आता मालिकेतच बघायला मिळणार आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.